फौजी आंबवडे (ता. महड) : भारतीय मजदूर संघाचे बांधकाम विभाग प्रदेश अध्यक्ष मोहन पवार यांच्या पत्नी स्मिता यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. याबद्दल वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष लकेश म्हात्रे, जिल्हा सेक्रेटरी रमेश गोविलकर, संघटक श्रीधर लहाने यांनी पवार परिवाराचे सांत्वन …
Read More »Yearly Archives: 2019
सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार; चार जखमी
जळगाव : प्रतिनिधी सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटून चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत घडली. बंदुकीचा लॉक काढताना सुरक्षा रक्षकाच्या हातून नजरचुकीने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सेंट्रल बँकेच्या वरणगाव शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून …
Read More »कविता आणि कथालेखन स्पर्धेचे आयोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई साहित्य परिषदेचे पाचवे साहित्य संमेलन दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे. यानिमित्ताने नवोदित साहित्यिकांना संधी मिळावी या हेतूने कविता आणि कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कविता स्पर्धेकरिता स्त्री भावनांचे दर्शन घडविणार्या कविता असाव्यात. कविता 16 ते 20 ओळींच्या असाव्यात. आलेल्या कवितांचा …
Read More »‘रसशास्त्र संभाषा’ परिसंवादाचे आयोजन
नवी मुंबई : प्रतिनिधी आयुर्वेदातील वनस्पती व प्राणीज घटकांबरोबरच सुवर्ण, रौप्य आदी विविध धातू व पारदसारख्या अन्य खनिज घटकांचा रोगनिवारणासाठी औषध म्हणून कशा पद्धतीने वापर करावा याचे मार्गदर्शन करणारे औषधी निर्माणाचे शास्त्र म्हणजे रसशास्त्र. रसशास्त्रातील औषधांची निर्मिती हे श्रीधूतपापेश्वर लिमिटेडचे खास वैशिष्ट्य. 145 वर्षांहून अधिक काळ श्री धूतपापेश्वर लिमिटेडद्वारा विविध …
Read More »एसबीआय डेबिट कार्ड होणार हद्दपार
मुंबई : प्रतिनिधी भारतातील मोठी आणि सर्वाधिक शाखा असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसबीआय बँकिग प्रणालीतून डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा विचार करत आहे. देशातील बहुतांश एसबीआय ग्राहक डेबिट कार्डवर अवलंबून आहेत, मात्र तरीही बँकेने या निर्णयाची तयारी केली …
Read More »अभिनंदन यांचा छळ करणार्या कमांडोचा खात्मा
नवी दिल्ली : भारतीय मिग-21 लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणार्या आणि टॉर्चर करणार्या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा …
Read More »मनसेचा यू-टर्न
मुंबई : प्रतिनिधी राज ठाकरे यांना आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)च्या नोटीसनंतर 22 ऑगस्ट रोजी या कार्यालयावर धडकण्याचा आक्रमक निर्णय मनसेने अचानक बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर येऊ नये, असे आवाहन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ‘कोहिनूर स्क्वेअर’ गैरव्यहारप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावल्याने मनसेने ईडीच्या कार्यालयावर धडकण्याचा …
Read More »अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेची स्थापना
मुंबई : प्रतिनिधी खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, युप्लिफ्टमेंट अॅण्ड ट्रेनिंग) ही संस्था स्थापन करण्यास मंगळवारी (दि. 20) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून, त्यात मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी विशेष …
Read More »कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मजगाव ग्रामपंचायतीतर्फे मदतफेरी
मुरुड : प्रतिनिधी महापुरामुळे कोल्हापूर -सांगली भागात खूप मोठी हानी झाली. त्या पूरग्रस्तांना मदत मिळावी, या हेतूने मजगाव (ता. मुरुड) ग्रामपंचायतीने मदत फेरीचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत हद्दीतील 14 विविध समाज संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी या मदत फेरीत सहभागी झाले होते. ते मदत फेरीतील दानपेटीत शक्ती पैसे टाकण्याचे आवाहन करीत …
Read More »धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग
नागोठणे : प्रतिनिधी पावसाचा जोर काही अंशी कमी होऊन ऊन पडावयास सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टाकलेल्या दगडसदृश मातीने आपला रंग दाखवण्यास प्रारंभ केला असून, महामार्ग सध्या धुरळ्यात हरवला असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराने पावडरमिश्रित दगडे टाकून मलमपट्टी केली होती. आता ऊन पडावयास प्रारंभ झाल्याने अवजड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper