खोपोली : प्रतिनिधी मुंबई -पूणे महामार्गावरुन चाललेला एलपीजी गॅसने भरलेला टँकर खालापूरजवळ माधवबाग येथे पलटी झाल्याची घटना बुधवारी (दि. 21) दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात गॅस गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातातून चालक सोमनाथ व्यकंट कांदे सुखरूप बचावला आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एचपी कंपनीचा भरलेला गॅस …
Read More »Yearly Archives: 2019
जिर्णे ग्रामपंचायतीमध्ये शेकापला धक्का ; चाफेगणीचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यात भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, जिर्णे ग्रामपंचायत हद्दीतील चाफेगणी आदिवासीवाडीवरील परशुराम हरी फसाले, दामा परश्या वाघ, परश्या पांड्या पिंगळा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 21) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे माजीमंत्री रविशेठ पाटील यांनी स्वागत केले. जिर्णे ग्रामपंचायत निवडणूकीच्या तोंडावर शेकापला हा मोठा …
Read More »विविध मार्गावर बससेवा सुरू कराव्यात; भाजपची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी पेण आणि पनवेल रेल्वे स्थानकातून जिल्ह्यातील विविध भागात जाण्यासाठी एसटीची बससेवा सुरु करावी, या इतर मागण्यांसाठी भाजपच्या वतीने एसटीच्या रायगड विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महेश मोहिते, शहर अध्यक्ष सुनील दामले, परशुराम म्हात्रे, अशोक वारगे यावेळी उपस्थित होते. विभागीय नियंत्रक अनघा …
Read More »गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंग सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, पेणमधून सुमारे 100 बसेस गणेशोत्सवासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या संख्येत गणेशोत्सव होईपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत परिसरातील …
Read More »टीम इंडियाविरुद्ध विंडीजची ‘कसोटी’
आजपासून पहिला सामना अँटिग्वा ः वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आता वेस्ट इंडिजसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. गुरुवार (दि. 22)पासून सुरू होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका यजमान विंडीजसमोर पत वाचविण्याची अखेरची संधी आहे. विशेष म्हणजे ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोडणारी आहे. भारत आणि …
Read More »प्रधान महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना
नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात एनएसएसतर्फे नुकतीच महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या अंतर्गत रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय संलग्न रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. रुग्णालयाचे समुपदेशक महेश गोसावी, मंगेश पाटील यांनी या वेळी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्सविषयी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांनी एड्स …
Read More »भारतीय पुरुष हॉकी संघ विजेता
टोकियो : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी (दि. 21) न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून विजेतेपद पटकाविले. या विजयासह भारतीय संघाने राऊंड रॉबीनमध्ये झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. कर्णधार हरमनप्रीत सिंग (7 मिनिटे), शमशेर सिंग (18 मि.), निलकांता शर्मा (22 मि.), गुरसाहीबजीत सिंग (26 मि.) आणि मनदीप …
Read More »अभिनव ज्ञानमंदिर संस्थेची सामाजिक बांधिलकी ; पूरग्रस्तांसाठी चार लाख 30 हजारांचा धनादेश
कर्जत, खोपोली : प्रतिनिधी येथील अभिनव ज्ञानमंदिर संस्थेने कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करून त्याचा धनादेश जनकल्याण समितीकडे सुपूर्द केला. यासाठी संस्थेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला असल्याची माहिती संस्थेचे सचिव जनार्दन मोघे यांनी प्रास्ताविकात दिली. …
Read More »बल्लाळेश्वर देवस्थानचा पूरग्रस्तांना मदतीचा हात ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख 11 हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश बुधवारी (दि. 20) मंत्रालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच देवस्थानतर्फे सुधागड तहसीलदारांकडे ब्लँकेट देण्यात आले. श्री …
Read More »‘निलिकॉन’च्या कंत्राटी कामगारांचा संप
रोहे : प्रतिनिधी न्याय हक्क देण्याबाबत निलिकॉन कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ येथील निलिकॉन कंपनीतील कंत्राटी कामगारांनी बुधवारी (दि. 21) सकाळपासून एक दिवसीय लाक्षणिक संप सुरू केला होता. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या कंपनी व्यवस्थापनाने युनियनच्या पदाधिकार्यांबरोबर सकारात्मक चर्चा केल्याने दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. रोहे तालुक्यतील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper