Breaking News

Yearly Archives: 2019

पालकमंत्र्यांच्या हस्ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वास्तूचे उद्घाटन

माणगाव ः प्रतिनिधी  – माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) करण्यात आले. माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्यातून अशोकदादा साबळे विद्यालय …

Read More »

‘माथेरानचा शारलोट तलाव गाळमुक्त करा’

कर्जत ः बातमीदार  – माथेरानकरांची व येथे आलेल्या पर्यटकांची तहान भागवणारा महत्त्वपूर्ण ब्रिटिशकालीन तलाव गेली पाच वर्षे साफ करून गाळमुक्त केला नसल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तो गाळ काढून हा तलाव गाळमुक्त करून नागरिकांना व पर्यटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या, अशी मागणी येथील स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली आहे. माथेरान …

Read More »

तक्रार

पनवेल एसटी स्टँड. सकाळची वेळ. दुसर्‍या दिवशी एकादशी असल्याने पंढरपूरला जाणार्‍यांची मोठी गर्दी होती. मुंबई, ठाणे, बोरिवली आणि पालघरकडून पंढरपूरला जाणार्‍या गाड्या येत होत्या, पण त्यात बसायला जागा नसल्याने कोणी गाडीत चढत नव्हते. एक पाच-सहा मध्यमवयीन व्यक्तींचा ग्रुप आला. त्यांनाही पंढरपूरला जायचे होते. पनवेलहून सुटणारी गाडी आता नसल्याचे समजल्याने त्यांनी …

Read More »

बिबट्याच्या तावडीतून सुटका अन्

जिल्ह्यातील मुरबाड या कर्जत तालुक्याला लागून असलेल्या तालुक्यातील करपटवाडीची ओळख मागील काही दिवसांत जगाला झाली आहे. या वाडीमधील आदिवासी कुटुंबातील चार सदस्यांवर जंगलात बिबट्याने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात आपल्या म्हातार्‍या आजीला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचे काम करणार्‍या त्या दोन बालकांना शौर्य पुरस्कार द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. कर्जत …

Read More »

कोकणाला अच्छे दिन

मोदी सरकार केंद्रामध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले आणि पुन्हा एकदा पाच वर्षांच्या यशस्वितेनंतर निवडणुकीला सामोरे जात आहे. विठ्ठलाची पूजा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा मुख्यमंत्रीही मीच असेन, असे आत्मविश्वासाने सांगितले. सरकारने केलेल्या कामाबद्दल त्यांना विश्वास आहे. सबका विकास हे ध्येय सरकारने समोर ठेवले. कोकणालाही यामुळे …

Read More »

संदीप गुरव यांची वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी निवड

नागोठणे : प्रतिनिधी येथील दिव्यांग तलवारबाजपटू संदीप गुरव याची 15 ते 23 सप्टेंबरदरम्यान दक्षिण कोरियात होणार्‍या व्हीलचेअर तलवारबाजी वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी देशभरातील सहा खेळाडूंची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील दोघांचाच समावेश आहे. संदीप गुरव यांनी आतापर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर …

Read More »

आज्जीबाई जेव्हा बुमराहच्या ’यॉर्कर’ची कॉपी करतात…

मँचेस्टर : वृत्तसंस्था भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे.  भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात एक लहान मुलगा बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना दिसला होता, पण आता चक्का आज्जीबाईच बुमराहच्या यॉर्करची कॉपी करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 2016मध्ये आंतरराष्ट्रीय …

Read More »

66वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ; हिमाचल प्रदेश, भारतीय रेल्वे, हरियाणा, बिहार उपांत्य फेरीत

पाटणा : वृत्तसंस्था हिमाचल प्रदेश, भारतीय रेल्वे, हरियाणा आणि यजमान बिहार यांनी 66व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गतविजेते हिमाचल विरुद्ध हरियाणा, तर भारतीय रेल्वे विरुद्ध बिहार यांच्यात उपांत्य लढती होतील. कबड्डीच्या इतिहासात बिहारने प्रथमच उपांत्य फेरी गाठली. पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या …

Read More »

राहुल आवारेसह तीन भारतीय मल्लांना सुवर्णपदक

इस्तंबूल : वृत्तसंस्था महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित कुस्ती मानांकन मालिकेत मैदान मारताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्यासह सीमा आणि मंजूकुमारी या महिला मल्लांनीही भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूल येथे ही स्पर्धा सुरू आहे. राहुलने 61 किलो वजनगटामध्ये बाजी मारली. अंतिम फेरीत …

Read More »

विजेंदर सिंगचा विजयी पंच; प्रो-बॉक्सिंगमध्ये सलग अकरावी जीत

नेवार्क : वृत्तसंस्था भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. वर्षभर रिंगपासून लांब राहिलेल्या विजेंदरने अमेरिकेच्या माइक स्नायडरचा पराभव करीत बॉक्सिंग करियरमधील 11वा विजय मिळविला. त्याचबरोबर प्रो-बॉक्सिंगमध्ये पराभूत न होण्याचा विक्रमही त्याने कायम राखला आहे. विजेंदर आणि स्नायडरदरम्यान अमेरिकेच्या नेवार्क (न्यूजर्सी) येथे हा सामना रंगला. आठ राऊंडच्या मिडलवेट …

Read More »