Breaking News

Yearly Archives: 2019

नेरळमधील रस्ते गेले पाण्याखाली

कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन लगत असलेल्या निर्माण नगरी भागात असलेले रस्ते पावसात पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाडा भागातून स्टेशनकडे वाहणारे पाणी रेल्वेने नवीन मोरी खोदून निर्माण नगरी भागात सोडले आहे. त्यामुळे निर्माण नगरी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून, नेरळ ग्रामपंचायतीने तात्पुरती सोय म्हणून नाला तयार करून पाणी वळविले …

Read More »

नागोठण्यात मुसळधार पाऊस, अंबा नदीला पूर

नागोठणे : प्रतिनिधी मागील पाच दिवस संततधार पडणार्‍या मुसळधार पावसाने येथील अंबा नदीने पहाटे आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने एसटी बसस्थानक, मरिआई मंदिर परिसर, कोळीवाडा तसेच हॉटेल लेक व्ह्यू परिसरात पुराचे पाणी भरले होते. मंगळवारी पहाटे सहा वाजता भरलेले पुराचे पाणी दुपारी ओसरायला सुरुवात झाली असली, तरी दुपारपर्यंत नदी …

Read More »

मच्छीमारांच्या समस्या मार्गी लावण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश

उरण ः रामप्रहर वृत्त  – जेएनपीटी चौथे बंदरबाधित ओएनजीसी पाईप लाईन प्रकल्पबाधीत मच्छीमारांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मच्छीमारांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जेएनपीटी चौथे बंदर व ओएनजीसीची पाईप लाईन प्रकल्पबाधित मच्छीमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत …

Read More »

रीटघर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त  – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल रीटघर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी पार पडला. 2005 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेचे माजी विद्यार्थी जयदास यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. तब्बल 14 वर्षांनी शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्याने शाळेतील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या …

Read More »

रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ ; रोह्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या

रोहे ः प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागाला गेल्या चार दिवसात पावासाने झोडपून काढले असून, सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने कुंडलिका नदीला पुर आला असून, तालुक्यात ठिकठिकाणी झाडे उन्माळुन पडली आहेत. तर रोहा -मुरूड मार्गावर कवळटे गावच्या हद्दीत व पालेखुर्द गावाच्या पश्चिम भागात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली …

Read More »

मनपात स्वतंत्र प्रभाग कार्यालये

सिडकोकडून चार ठिकाणी भूखंडांची खरेदी पनवेल ः बातमीदार  – प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी पनवेल महापालिकेने तयारी सुरू केली असून, स्वतंत्र प्रभाग कार्यालये उभारण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांची भूखंड खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सध्या पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेली कार्यालये स्वतंत्र ठिकाणी असणार आहेत. 110 चौरस किलोमीटरच्या पनवेल महापालिका क्षेत्रात …

Read More »

मेन लाईन आणि हार्बर लाईन जोडण्याकडे दुर्लक्ष

पनवेलमध्ये उपनगरीय रेल्वे 1996 मध्ये सुरू झाली. पनवेल शहराचा विकास होत असताना रेल्वेमुळे झपाट्याने आजुबाजूच्या परिसराचे नागरीकरण होत आहे. आज या स्थानकातून वर्षभरात जवळपास 50 कोटी प्रवासी प्रवास करीत असल्याने लवकरच या स्थानकाचा समावेश ‘अ 1’ श्रेणीत होणार आहे. पनवेल स्टेशनमध्ये प्रवाशांना पुरेशा मूलभूत सुविधांपासून तर वंचित ठेवण्यात आले आहेच …

Read More »

यंत्रणेत सुधाराची गरज

एकीकडे रेल्वे, बस आदी सार्वजनिक सेवा कोलमडलेल्या असतानाच रिक्षा, टॅक्सीवाले ग्राहकांना नाडतात. कुठे जायचे, कुठे जायचे नाही, यावरून प्रवाशांशी अरेरावीची भाषा करतात. रेल्वे, रस्त्यांची अवस्था यात गेल्या अनेक वर्षांत फारशी सुधारणा नाही. अर्थात हळूहळू परिस्थिती पालटते आहे. येत्या काही वर्षांत मेट्रोचे जाळे शहरभरात पसरेल. उपनगरे व आसपासचा परिसरही अधिक चांगल्या …

Read More »

‘मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024’चा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि दिपांकर्स बॅडमिंटन अ‍ॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024 या अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि. 30) करण्यात आला. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात होणार 15 हजार रोपांची लागवड

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वन विभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने मनपा क्षेत्रात 15 हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ सोमवारी (दि. 1) पिसार्वे येथे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख …

Read More »