Breaking News

Yearly Archives: 2019

विश्वजीत बारणेंच्या प्रचार फेरीला प्रतिसाद

रसायनी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांनी रसायनी परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असणार्‍या मोहोपाडा व वावेघर बाजारपेठेतील दुकानदारांशी संवाद साधून रसायनी परिसर पिंजून काढला आहे.  वडिलांच्या प्रचाराची धुरा विश्वजीतने हाती घेतल्याने रसायनीत त्यांना तरुणांकडून …

Read More »

महायुतीच्या प्रचाराचा ग्रामीण भागात जोर; दिघाटी व केळवणे गावात प्रचार रॅली, कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचाराने पनवेल तालुक्याचा ग्रामीण भाग ढवळून निघाला असून, रविवारी दिघाटी, केळवणे गावात जोरदार प्रचार करून मतदारांशी संवाद साधण्यात आला.  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, रायगड …

Read More »

बाप्पा, या पार्थला सुबुद्धी दे! बूट घालूनच घेतले देवदर्शन, दादापुत्र पुन्हा एकदा ट्रोल

कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे कर्जत दौर्‍यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाच संवाद सभा पूर्ण करून सहाव्या सभेसाठी जात असताना रस्त्यात असलेल्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर गणपती बाप्पाला हार घातला आणि ते निघून गेले, पण त्या वेळी त्यांचे व्हायरल झालेले फोटो …

Read More »

खोपोलीत इंडिया स्टील कारखान्यात स्फोट

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : पोलाद उत्पादन करणार्‍या खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्याच्या एओडी विभागातील बॉयलरच्या ठिकाणी रविवारी (दि. 14) दुपारी अचानक स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.खोपोली शहरात प्रदूषणाच्या मुद्यावरून स्थानिक व इंडिया स्टील कारखाना व्यवस्थापन यांच्यात नेहमीच वाद सुरू असतात.  …

Read More »

अष्टमी येथे घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान

रोहे ः प्रतिनिधी : अष्टमी येथील सुर्वे आळीमधील एका घराला शनिवारी (दि. 13) रात्री आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सर्वच लोक घराबाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे वृत्त समजताच सर्व अष्टमीकर …

Read More »

रायगडात महामानवाला अभिवादन

देशाच्या उभारणीत डॉ. बाबासाहेबांचे महत्त्वाचे योगदान -भीमराव इंगळे अलिबाग : प्रतिनिधी : देशाच्या उभारणीत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी अनेक योजना सुचविल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांचे ऐकले असते तर देश सुजलाम, सुफलाम झाला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भीमराव इंगळे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …

Read More »

डॉ. आंबेडकर यांना देशवासीयांचे अभिवादन

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ही जयंती आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम केले. चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी येथे भीम अनुयायांनी महामानवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रविवारी घेतला …

Read More »

उद्या महायुतीचा प्रचार दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि. 16) पनवेल तालुक्यात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. प्रचार दौर्‍यास शेडुंग फाटा येथून सकाळी 9.30 वा. सुरुवात होणार असून, पुढे भिंगार, सांगडे, बेलवली, वारदोली फाटा, लोणीवली, पाली-वांगणी, नेरे, …

Read More »

महायुतीच्या प्रचाराचा धडाकाच धडाका…

मतदारांशी थेट संवाद साधण्यात भाजप कार्यकर्ते यशस्वी; बारणेंच्या विजयासाठी कसली कंबर खारघर : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीतील प्रचाराने आता चांगलाच वेग पकडला असून, मावळ मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइंचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाकाच लावला आहे. रविवारी खारघर येथे प्रभाग 4मधील सेक्टर 11 येथे जोरदार …

Read More »

परिस्थिती बदलायची असेल, तर परिवर्तन करा -मुख्यमंत्री

बारामती/सुपे ः प्रतिनिधी बारामतीकरांनी सत्तेत असताना शेतीचे सिंचन करण्याऐवजी स्वतःच्या तिजोरीचेच सिंचन केले. परिणामी, जल मिळण्याऐवजी बारामतीच्या जिरायती भागाच्या नशिबी मृगजळ आले. ही परिस्थिती बदलायची असेल, तर परिवर्तन करा, पाणी देतो, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केले. महायुतीच्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचारार्थ बारामती तालुक्यातील सुपे या …

Read More »