Breaking News

Monthly Archives: January 2020

नववर्षात नव्या नोकर्यांची संधी; सात लाख रोजगारांची होणार निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी  नव्या वर्षात नव्या नोकर्‍या उत्पन्न होणार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नव्या वर्षात खासगी क्षेत्रात जवळपास 7 लाख नवीन रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती एका सर्व्हेतून उघड झाली आहे. तसेच कर्मचार्‍यांना सरासरी 8 ते 10 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ मिळणार असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. …

Read More »

शेवगाव-मुंबई बसचे पनवेल येथे स्वागत

पनवेल : बातमीदार शेवगाव-पाथर्डी रहिवासी मित्र परिवाराच्या वतीने पनवेल आगार या ठिकाणी शेवगाव-मुंबई शयनयान व आसनाची व्यवस्था असणार्‍या व नव्याने सुरू झालेल्या बसचे स्वागत करण्यात आले. चालक साहेबराव मिसाळ व वाहक बाळासाहेब पानसरे यांच्या हस्ते गाडीचे पूजन झाले. त्यांचे राजेंद्र राऊत व गणेश राऊत यांनी स्वागत केले. चंद्रकांत देवढे यांनी …

Read More »

तीन पिढ्यांची एकाच वेळी रायगड प्रदक्षिणा

महाड : प्रतिनिधी येथील युथ क्लबने आयोजित केलेल्या रायगड प्रदक्षिणेमध्ये आजोबा, मुलगा आणि नातवाने एकाच वेळी सहभाग घेतला होता. पाच वेळा रायगडला प्रदक्षिणा करणारे 69 वर्षीय विनायक केळकर आणि 75 वर्षांचे देशपांडे आजोबा यांनी त्यांचा मुलगा व नातवासह ही प्रदक्षिणा पूर्ण केली. युथ क्लबच्या या विक्रमी व शिस्तबद्ध रायगड प्रदक्षिणेने …

Read More »

नववर्ष शुभेच्छा! पनवेल : नववर्षानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांना शुभेच्छा दिल्या.

Read More »

टँकरमधील केमिकलमुळे सावित्री नदीतील मासे मृत्युमुखी

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वाहणार्‍या सावित्री नदीपात्राजवळच्या जमिनीवर शनिवारी (दि. 28) पहाटे एका टँकरमधून विषारी केमिकल जमिनीवर सोडण्यात आले. त्यानंतर वायू प्रदूषण होऊ लागल्याने या मातीवर पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते पाणी सावित्री नदीपात्रात गेल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले. पोलादपूर तालुक्यातील पार्ले आणि …

Read More »

मुरूडकिनारी पर्यटकांकडून नववर्षाचे स्वागत

मुरूड : प्रतिनिधी पर्यटन महोत्सवामधील प्रसिद्ध कलाकारांच्या न्यू ईअर कल्ला या कार्यक्रमात बेधुंद संगीतावर ताल धरत सुमारे 20 हजार पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर सरत्या वर्षाला बाय बाय करत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मंगळवारी सायंकाळपासून मुरूड समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटक सायंकाळच्या सप्तरंगात घोडागाडीची सफर करताना दिसत होते. तर …

Read More »

आठवडा बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ; कारवाईची मागणी

पनवेल : बातमीदार नवीन पनवेल सेक्टर 5 डी मार्टसमोर व सेक्टर 1 परिसरात आठवडा बाजारामध्ये शुक्रवारी (दि. 27) येथून एका व्यक्तीच्या खिशातून 12 हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला आहे. यापूर्वीदेखील या बाजारात आलेल्या नागरिकांच्या वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. दर …

Read More »

खोपोलीतील रस्ता नामकरणाची मागणी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सुभाषनगर खोपोली येथील ग्रामस्थांनी शहरातील मस्को गेट ते सुभाषनगर या रस्त्याचे  कै. सखाराम गेणु जाधव मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने खोपोली नगर परिषदेला देण्यात आले आहे. खोपोली शहरातील मस्को गेट ते सुभाषनगर हा 50 वर्षे जुना …

Read More »

ज्यांच्या बोटी नाहीत ते मच्छीमारांमध्ये वाद निर्माण करताहेत

वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेल्फेअर असोसिएशनचा आरोप अलिबाग : प्रतिनिधी पारंपरिक मच्छीमारी करणारेदेखील नियम पळत नाहीत. ज्यांच्या बोटी नाहीत ते मच्छीमारांचे नेते बनलेत. हेच लोक मच्छीमारांमध्ये वाद निर्माण करत आहेत. त्यांच्या दबावाखाली येऊन पर्ससीन नेट मासेमारी करणार्‍यांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जात आहे, असा आरोप वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेल्फेअर …

Read More »

उरणमध्ये आचार्य अत्रे कट्टाचा कार्यक्रम

चिरनेर : प्रतिनिधी रायगड जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटना संचलित, आचार्य अत्रे कट्टा कार्यक्रम नुकताच उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व कट्ट्याचे अध्यक्ष धनंजय गोंधळी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय गायकवाड हे उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणार्‍या सभासदांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये …

Read More »