Breaking News

Monthly Archives: January 2020

पेण शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ

पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या विविध प्रभागात रस्त्यांच्या कामाला प्रारंभ झाला असून, शहरातील कुंभारआळी (प्रभाग क्रमांक 1) येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिक का. रा. पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. भाजप कोकण विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, हितेश पाटील, …

Read More »

म्हसळ्यातील शिक्षकांनी घेतले केंद्र सरकारचे ‘निष्ठा‘चे धडे

म्हसळा : प्रतिनिधी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्‍या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणाना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लीश …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटांत हाणामारी

13 जणांवर गुन्हा दाखल पेण ़: प्रतिनिधी पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटात हाणामारी होऊन त्यामध्ये एका गटातील दोन व दुसर्‍या गटातील एक असे एकूण तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एका गटातील पाच व …

Read More »

आज नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव

नागोठणे : प्रतिनिधी येथील श्री अय्यपा सेवा मंडळाच्या वतीने 23 वा अय्यपा महोत्सव आज रविवारी (दि. 12) साजरा करण्यात येत आहे. नागोठणे प्रभुआळीतील कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर परिसरात कुनत्तूमना शशिकुमार नंबुद्री यांच्या हस्ते हा पूजा महोत्सव संपन्न होणार आहे. पहाटे पाच वाजता महागणपती होमाने या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला …

Read More »

नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनार्थ आज खोपोलीत रॅली

खोपोली : प्रतिनिधी भारतीय संविधानातील सर्व संसदीय कार्यप्रणालीचा अवलंब करून बहुमताने नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेत व राज्यसभेत मंजूर झाला. या कायद्याच्या जनजागृती व समर्थनार्थ  जागरूक नागरिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 12) सकाळी 10 ते 12. 30 या दरम्यान खोपोलीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरूवात शहरातील फायर ब्रिगेड …

Read More »

मुरूडमध्ये उलटी-जुलाबाची साथ

डोंगरीत 50पेक्षा जास्त रुग्ण; आंबोली, एकदरातही बाधा मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरी, आंबोली व एकदरा गावांत दूषित पाण्यामुळे उलटी जुलाबाची साथ सुरु झाली असून, रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून, रुग्णांची काळजी घेण्यात यंत्रणा व्यस्त झाली आहे. डोंगरी, आंबोली व एकदरा या …

Read More »

पनवेलमध्ये भाजपचा डबल धमाका

महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांची बाजी पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपद निवडणुकीत जगदिश गायकवाड व नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे या भाजप, आरपीआय मित्रपक्षाच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत व अपेक्षित विजय मिळवत पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. पनवेल …

Read More »

पद्मदुर्ग किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांनाही आहे. गड-किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास, कथा- कादंबर्‍यांपेक्षा प्रत्यक्ष स्थळ दर्शनाने इत्थंभूत उभा राहतो. ज्याची आरमारावर सत्ता त्याची जगावर सत्ता ही धारणा दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांची होती. या द्रष्टेपणातूनच महाराजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच प्रमुख जलदुर्ग उभे केले. त्यामध्ये मुरूडच्या पद्मदुर्गचा समावेश आहे. ऐतिहासिक दस्तऐवजानुसार इस 1678च्या सुमारास …

Read More »

निगुर्णाचे भेटी…

संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासूनच वादांचा धुरळा उडत राहतो आणि संमेलन आटोपले तरी तोे खाली बसत नाही हा आजवरचा अनुभव होता. गेल्या वर्षीपासून मात्र साहित्यसंस्कृती मंडळाने अध्यक्ष निवडण्यासाठी राजकारण्यांसारख्या निवडणुका न घेता एकमताने अध्यक्ष निवडण्याचा नवा पायंडा पाडला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचीही निवड यंदा एकमतानेच झाली, ही समाधानाची बाब आहे. ‘सह नेते …

Read More »

प्रवाशांनी दिला तरुणांना चोप; ट्रॅव्हल्स बस चालकासोबत किरकोळ वाद

पनवेल : बातमीदार किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून खासगी ट्रॅव्हल बसच्या चालकाला मारण्यासाठी बसमध्ये घुसलेल्या तीन कॉलेज तरुणांना बसमधील प्रवाशांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मंगळवारी (दि. 7) रात्री कामोठे येथे घडली. कळंबोली पोलिसांनी तिन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मारुती मोरे हा बसचालक मुंबईतील वैभव ट्रॅव्हल्समध्ये …

Read More »