पेण : प्रतिनिधी शरीर निरोगी राहावे यासाठी किमान एक तास तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदरतेबरोबरच स्वास्थ्यपूर्ण पेण ही संकल्पना अमलात आणण्यासाठी व याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून पेण नगर परिषदेने मॅरेथॉन आयोजित करून स्तुत्य उपक्रम राबविल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 2) येथे काढले. मिनी …
Read More »Monthly Archives: February 2020
‘ती’च्या पोषणावर भर
लिंगाधारित भेदभावांमुळे मुलींचे पोषण नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. विशेषत: किशोर वयापासून मुलींचे उत्तम पोषण होणे हे निव्वळ तिच्याच नव्हे तर भविष्यातील तिच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. परंतु आपल्याकडील विशेषत: ग्रामीण भागातील एकंदर समाजरचनेत ही बाब पूर्णत: दुर्लक्षित राहते. आता सरकारी पातळीवरील पुढाकारामुळे संबंधित दृष्टिकोनात बदल घडून होण्यास चालना मिळेल …
Read More »डॉक्टर नसल्याने बालकाचा मृत्यू; सुकेळीतील जिंदाल रुग्णालयाला ठोकले टाळे
नागोठणे : प्रतिनिधी सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या अंतर्गत असणार्या बी. सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या जिंदाल रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथे उपचारासाठी आणलेल्या तीन महिन्यांच्या आदिवासी बालकाचा रविवारी (दि. 2) मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पनवेलला नेत असताना महामार्गावर वडखळनजीक त्याला मृत्यूने गाठले. ही घटना कळल्यावर संताप …
Read More »‘शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली’
पुणे : प्रतिनिधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणार्या ‘सीएए’-‘एनआरसी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी …
Read More »कामोठ्यात विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन ‘रयत’चे सचिव भाऊसाहेब कराळे यांच्या हस्ते आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची भरदिवसा हत्या
लखनौ : वृत्तसंस्था विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. 2) सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौत घडली. बच्चन हे मॉर्निंग वॉकला जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. रणजित बच्चन रविवारी सकाळी 6.30 वाजता लखनौतील हजरगंज परिसरात मॉर्निंग वॉकला निघाले होते. मित्रांसमवेत ग्लोब …
Read More »छत्रपती शिवरायांच्या समाधीपुढे राज्यपाल नतमस्तक; किल्ले रायगडची केली पाहणी
महाड : प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर आले असून, रविवारी (दि. 2) दुपारी त्यांनी किल्ले रायगडला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे ते नतमस्तक झाले. राज्यपालांचे महाड एमआयडीसीतील हेलिपॅडवर आगमन झाल्यावर तेथून ते पाचाड येथे आले. तेथे त्यांनी राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते रोप …
Read More »हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. ‘इतकी वर्षे मुंबईकरांसोबत बनवाबनवी करणारे हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर’ असा निशाणा शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे लगावला आहे. आशिष शेलार यांनी …
Read More »‘किवीं’ना व्हाईटवॉश : भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक मालिका विजय
माऊंट माऊंगनुई : वृत्तसंस्था भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात सात धावांनी विजय मिळवत मालिका 5-0ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करीत 163 धावा केल्या होत्या, मात्र प्रत्यत्तरात न्यूझीलंडला 9 बाद 156 धावाच करता आल्या. न्यूझीलंडच्या भूमीवर याआधी कोणत्याही संघाला द्विपक्षीय मालिकेत असा विजय मिळवता आलेला नाही. पाचव्या सामन्यात भारताने दिलेले …
Read More »भिडस्त
साध्या गरीब माणसांवर सगळे अन्याय करीत असतात असे आपण म्हणतो. काही माणसांचा स्वभाव भिडस्त असतो. त्याचा गैरफायदा अनेक जण घेत असतात. पण ही माणसे त्याला कसे बोलायचे म्हणून गप्प बसतात. हे पाहून कधी कधी वाटते यांना असेच पाहिजे. अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे म्हणतात ते काही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper