नागोठणे : प्रतिनिधी येथील तलाठी कार्यालयाचे प्रमुख अनंत म्हात्रे 35 वर्षांची सेवा बजावून 31 जानेवारीला निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ रोहे येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी डॉ. माने यांच्या हस्ते म्हात्रे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन …
Read More »Monthly Archives: February 2020
कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत रॅली
नागोठणे : प्रतिनिधी कुष्ठरोग व क्षयरोगाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने येथील कोएसोच्या कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली रॅली संपूर्ण शहरात फिरविण्यात आली. वरिष्ठ क्षयरोग परिवेक्षक महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, यशवंत कर्जेकर, …
Read More »कर्जतमध्ये भाजपच्या बैठका उत्साहात
कडाव ः प्रतिनिधी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण कर्जत तालुक्यात भाजपच्या झंझावाती बैठकांना सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, नितीन कांदळगावकर, युवा …
Read More »जोकोविचचा विक्रम; ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद
मेलबर्न : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थिमचा अंतिम सामन्यात पराभव केला. जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे आठवे विजेतेपद ठरले. याआधी त्याने 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016 आणि 2019मध्ये या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
Read More »नेरळ स्थानकात पादचारी पूल कधी उभारणार?
संतप्त प्रवाशांचा सवाल कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात 2003मध्ये पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी दोन्ही बाजूला पिलर उभे करण्यात आले असून पुलाचे काम अनेक वर्षे थांबले आहे. दरम्यान, नेरळसारख्या जंक्शन रेल्वे स्थानकात सध्या एकच पादचारी पूल अस्तिवात असून मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्थानकात …
Read More »बामणडोंगरी (ता. पनवेल) : एम. जे. ग्रुपच्या वतीने इंडियाज डान्स किंग ग्रुप चॅम्पियनशिप 2020चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वहाळच्या साई संस्थानचे रविशेठ पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत करण्यात आले.
Read More »महाडमध्ये मॅरेथॉनद्वारे पर्यावरणाचा संदेश
महाड : प्रतिनिधी वेदा जनजागृती मंच आयोजित जाणता राजा मॅरेथॉनमध्ये पर्यावरणाचा संदेश देत रविवारी (दि. 2) महाडकर धावले. मिसेस इंडिया राखी सोनार यांनी नातेखिंड येथे झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत पाच किमीच्या खुल्या गटात दापोलीच्या सिद्धेश बर्जे याने प्रथम क्रमांक पटकावला. ओमकार बैकर आणि सिद्धेश भुवड यांनी अनुक्रमे …
Read More »माथेरान एमटीडीसीमध्ये पारंपरिक जेवणाची लज्जत
माथेरान हे ब्रिटिशांनी शोधून काढलेले माथ्यावरील रान म्हणजे माथेरान हे आज वाहनांना बंदी असलेले जगातील एकमेव असे पर्यटनस्थळ आहे. या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यात धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटक चारही महिने गर्दी करतात, तर हिवाळ्यात येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाला की सर्वांना थंड हवेच्या ठिकाणाची …
Read More »‘केसीपीएल’चे शानदार उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटीझन फोरम यांच्या वतीने 40 वर्षांवरील क्रिकेटवीरांसाठी खांदा कॉलनी प्रीमियर लीग (केसीपीएल) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) झाले. उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेच्या …
Read More »पेण मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; करण माळी, ऋतुजा सकपाळ प्रथम
पेण : प्रतिनिधी स्वच्छतेचा संदेश घरोघरी जावा या उद्देशाने पेण नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि. 2) मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विविध गटातील मुले, मुली, महिला, पुरुषांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या गटात करण माळी व ऋतुजा सकपाळ यांनी बाजी मारली. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. …
Read More »