Breaking News

Monthly Archives: February 2020

न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तयमुना शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या गव्हाण येथील न्यू इंग्लिश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 31) उत्साहात साजरा झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना या संस्थेच्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असे गौरवोद्गार काढले.या वेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर …

Read More »

‘एल्फिन्स्टन’चे नामांतर काळाची गरज!

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाविद्यालयाला द्यावे! भारतावर इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केले आणि हजारो वर्षांच्या आपल्या प्रथा, परंपरा, संकेत यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न करून आपल्या अर्थातच ब्रिटिशांच्या पाऊलखुणा उमटविल्या. त्या इतक्या घट्ट बसल्या आहेत की त्या खरवडून खरवडूनसुद्धा जाता जात नाहीत. ब्रिटिशांनी आपल्याला बर्‍याच देणग्या देऊन ठेवल्या आहेत …

Read More »

जीवन गाणे गातच राहावे…

नवीन वर्ष सुरू होऊन पहिला महिना सरलासुद्धा. नववर्षासाठी केलेले अनेकांचे संकल्प कधी विरून गेले ते त्यांनाही कळले नसेल. गमतीचा भाग सोडा, पण मानवी जीवन इतके वेगवान आणि व्यस्त झाले आहे की दैनंदिन धावपळीत स्वत:सह इतरांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. याच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कळत-नकळत माणूसपण कुठेतरी हरवत चालले आहे. आजच्या …

Read More »

राज्यपाल दोन दिवसांच्या रायगड जिल्हा दौर्‍यावर

अलिबाग : जिमाकाराज्यपाल भगतसिंह कोश्यारी 2 व 3 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. ते पहिल्या दिवशी आपल्या दौर्‍यात किल्ले रायगडची पाहणी करणार असून, दुसर्‍या दिवशी अलिबाग येथे जिल्हा नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक घेणार आहेत. राज्यपाल कोश्यारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.05 वाजता महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे येऊन …

Read More »

विवेक पाटलांनी पोकळ आश्वासने देण्याऐवजी आमचे पैसे परत करावेत

ठेवीदारांची खारघरमध्ये जोरदार मागणी ;दिशाभूल व थापेबाजीविरोधात तीव्र संताप पनवेल : रामप्रहर वृत्तरिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करीत हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आणि गोरगरीब खातेदारांचे पैसे बळकावणारे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार व शेकाप नेते विवेक पाटील यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, मात्र तरीही मोठमोठ्या वल्गना करून ठेवीदारांची …

Read More »

‘अर्थ’भरारी

मोदी सरकारचे सर्वसमावेशक बजेट नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प शनिवारी (दि. 1) सादर केला. सीतारामन यांनी 2020-21 या आर्थिक वर्षासाठीचे हे बजेट संसदेत मांडले. यात त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती व विकासाच्या दृष्टीने दिलासादायक व सर्वसमावेशक घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री म्हणतात…भारतीय अर्थव्यवस्था …

Read More »

श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

खारघर : श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायण महापूजेचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी दर्शन घेतले. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. भाजप शहर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेता नितेश पाटील उपस्थित होते.

Read More »

करंजाडे येथे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा करंजाडे शहर यांच्या वतीने शुक्रवारी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. करंजाडे सेक्टर 5 मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजश्री साबळे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली …

Read More »

पनवेल महापालिकेकडून अडीच टन प्लास्टिक जप्त

सव्वा दोन लाखांचा दंड वसूल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर शनिवारी (दि. 1) सकाळी 6.00 वाजल्यापासून अचानक धाडी घालुन सुमारे 2.5 टन प्लास्टिक जप्त केले. तसेच दोन लाख 25 हजार रूपयांचा दंड वसूल केला.  या प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये पिशव्या व प्लास्टिकच्या वस्तू आढळून …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन, गुणगौरव समारंभ

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण सोहळा व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवारी (दि. 4) सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात, समांरभाचे अध्यक्ष …

Read More »