रेवदंडा ः प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या संकटकाळात शासनाने लॉकडाऊन जारी केल्याने रोजदांरीवर काम करीत असलेल्या ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत साळाव ग्रामपंचायत सरपंच नीलम पाटील, उपसरपंच दिनेश बापळेकर, ग्रा. पं. सदस्य व ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे यांनी सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून साळाव …
Read More »Monthly Archives: April 2020
अपघातात तीन जण जखमी
पेण ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एर्टिगा कारची टाटा मॅजिक गाडीला धडक बसून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि.19) एर्टिगा कारचालक आपल्या ताब्यातील कार नागोठण्याहून वडखळकडे दुपारच्या सुमारास रस्त्याच्या परिस्थतीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने घेऊन जात होता. या वेळी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवरून गाडी जोरात उडून …
Read More »मुक्या प्राण्यांची काळजी घ्या!; प्राणीमित्रांचे आवाहन
पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीत मुक्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. अन्न व खाद्यपदार्थांची दुकाने तसेच हॉटेल्स बंद असल्याने कचर्यात तसेच उकिरड्यावर पडलेले अन्नही भटक्या प्राण्यांना मिळत नाही. एप्रिलमध्ये उन्हाचा पारा वाढल्याने प्राणी-पक्ष्यांचा अन्नपाण्यावाचून तडफडून मृत्यू होण्याची शक्यता असल्याने मुक्या …
Read More »बौद्ध समाज सेवा संघाकडून अन्नधान्याचे वाटप
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुका बौद्ध समाज सेवा संघाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील आगरदांडा, खरआंबोळी, सायगाव, तेलवडे, विहूर, माजगाव, नांदगाव, उसरोळी, वाकळवती आदड, काशीद, बारशीव, बोर्ली आदी गावांतील मोलमजुरी करणारे मजूर, निराधार विधवा महिला व अपंग घटकातील 250 कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. सदर उपक्रमात …
Read More »नेरळ पोलिसांची धडक कारवाई; संचारबंदीत फिरणार्या वाहनचालकांना दंड; पावणेदोन लाखांचा महसूल गोळा
कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे संचारबंदी जारी असून शासनाच्या आदेशाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनांना पेट्रोल देऊ नये, असे आदेश आहेत. तरीही अनेक वाहने रस्त्यावर दिसत असून अशा वाहनांवर रायगड पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले आहेत. त्यानुसार नेरळ पोलिसांनी एप्रिल महिन्यातील 19 दिवसांत एक लाख 80 हजारांचा महसूल …
Read More »विकासचक्र पुन्हा फिरणार
कोरोनामुळे गेले अनेक दिवस बंद असलेली उद्योगासह अन्य क्षेत्र पुन्हा एकदा सुरू होत आहेत. माणसाचा जीव सर्वात महत्त्वाचा असला तरी याच माणसाला जगविण्यासाठी विकासाचे चक्र अविरत फिरणे आवश्यक आहे. म्हणून केंद्र शासनाने टाळेबंदीतील काही निर्बंधांमध्ये सूट देऊन शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. संपूर्ण जग सध्या …
Read More »जासई परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई हद्दीतील बिल्डींग इ व एफ रेल्वे कॉलनी, जासई गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या …
Read More »महाड तालुक्यात वादळी वार्यासह गारांचा पाऊस
महाड : प्रतिनिधी तालुक्यात रविवारी (दि. 19) सायंकाळी वादळी वार्यासह गारांचा पाऊस पडला. पावसामुळे हवेत गारवा आला असला, तरी हा पाऊस पिकांसाठी नुकसानदायक ठरू शकतो. मध्यंतरीही महाडला वादळी पावसाने झोडपले होते. तशाच प्रकारे रविवारी पुन्हा सायंकाळी हजेरी लावली. या पावसामुळे उष्म्यापासून दिलासा मिळाला खरा, पण नुकसान होण्याची भीती व्यक्त होत …
Read More »रस्त्यावर संदेश लिहून जनजागृती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण पालिकेचा उपक्रम
पेण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण शहरात नगर परिषदेमार्फत स्वच्छता व जनजागृती मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील रस्त्यांवर प्रबोधनात्मक संदेश लिहून जनजागृती करण्यात येत आहे. पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, फवारणी, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सर्व कर्मचार्यांना आरोग्यविषयक साहित्य देण्यात आलेले आहे. …
Read More »नागोठण्यातही 33 जण ताब्यात
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यातही मॉर्निंग वॉक करणार्या 33 जणांना रविवारी (दि. 19) नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. यात काही महिलांचाही समावेश होता. कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन व संचारबंदीकडे दुर्लक्ष करीत नागोठण्यातील काही नागरिक बिनक्कित फिरत आहेत. अशाच प्रकारे रविवारी नागोठणे-वासगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉक करीत असताना 33 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. …
Read More »