Breaking News

Monthly Archives: May 2020

देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदान ः नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 60वा वर्धापनदिन अर्थात हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन शुक्रवारी (दि. 1) साधेपणानेच साजरा करण्यात आला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आता 60 वर्षे पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान …

Read More »

विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

खोपोली ः बातमीदारविद्युतवाहक तारेच्या संपर्कात आलेल्या आठ वर्षीय सीजम संजय चितोडिया (सध्या रा. साजगाव) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खालापुरातील साजगाव येथे गुरुवारी (दि. 30) दुपारी घडली. बुधवारी संध्याकाळी वादळी वार्‍यासह पावसाच्या तडाख्यामुळे खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि झाडे कोसळली होती. गुरुवारी सीजम याच अवकाळी पावसाचा बळी …

Read More »

मार्केटमधील गर्दीच्या नियोजनाकरिता व्यापारी प्रतिनिधींसोबत चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण नाका ते टपाल नाक्यादरम्यानच्या मार्केट परिसरातील बेबंद गर्दीचे नियोजन करण्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर आणि व्यापारी प्रतिनिधींची नुकतीच सविस्तर बैठक झाली.टपाल नाका ते उरण नाका परिसरातील गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. या गर्दीवर कोणतेही …

Read More »

…अन्यथा 4 मेपासून पनवेल बंद ः आ. प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी पनवेलहून मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी जात असलेल्यांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 80 टक्के हेच कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे पनवेल परिसरावर मोठ्या संकटाचे ढग पसरले आहेत. शासनाने उद्योजकांना जो नियम लावला आहे, त्याचप्रमाणे या कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली …

Read More »

पनवेलमध्ये एका दिवसात तब्बल 13 रुग्ण

रायगडातील एकूण आकडा शंभरीपार पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 1) तब्बल 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे. या रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटिव्ह झालेल्यांच्या घरातील आठ जणांचा समावेश असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांची मुंबईला जाणार्‍यांची राहण्याची सोय कामाच्या ठिकाणीच करावी, ही मागणी योग्य असल्याचे दिसून …

Read More »

सावधपणे सवलती द्या

मुंबई, पुणे, नागपूरचा काही भाग तसेच अन्य काही रेड झोन्समधील परिस्थिती अजूनही गंभीर म्हणावी अशीच आहे. त्यामुळेच निव्वळ ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्येच टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करता येतील. अखेर 4 मेपासून 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची केंद्राची घोषणा शुक्रवारी आली. मात्र, निरनिराळ्या राज्यांत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, भाविक, पर्यटक आणि …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करू नये!

संजयआप्पा ढवळे यांचे आवाहन माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना विषाणूचे लोण महाराष्ट्रात वेगाने फैलावत असून मुंबई, पुण्यापाठोपाठ रायगडमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी 3 मेपासून लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. या भीषण परिस्थितीत लोकांचे उद्योगधंदे बंद पडून रोजंदारीवर काम करणार्‍या लोकांच्या हाती पैसा नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे …

Read More »

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

रोहे ः प्रतिनिधी – रोहा तालुक्यात बुधवारी (दि. 29) झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील नागरिकांच्या घरांची कौले व आंबा बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे. रोहा तालुक्यातील काही भागात बुधवारी संध्याकाळी वादळी वार्‍यासह पडलेल्या जोरदार पावसामुळे …

Read More »

प्रवास करताना घ्या काळजी

लाखो वर्षांपूर्वी कधीतरी मानव प्राणी जन्माला आला व त्यानंतरची हजारो वर्षे तो पायी, फार फार तर प्राण्यांच्या पाठीवर बसूनच प्रवास करीत होता. विज्ञान-तंत्रज्ञानाने प्रगती केली व प्रवासासाठी अत्याधुनिक वाहने आली. हा वेग व हे तंत्रज्ञान कितीही उपयोगी ठरणारे असले तरी याचे ‘बाय प्रॉडक्ट्स’ असल्यासारखे अपघात व दुखणीही त्यामागोमाग आलीच. दुचाकी, …

Read More »

आ. रविशेठ पाटील यांची वादळाने नुकसानग्रस्त झालेल्या भागाला भेट

नागोठणे ः प्रतिनिधी – स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 30) सायंकाळी नागोठणे शहरात वादळात नुकसान झालेल्या भागाला भेट दिली. या भेटीनंतर आ. पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन यासंदर्भात चर्चा केली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रोहे तहसीलदार कविता जाधव, रोहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र …

Read More »