पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या संकटकाळात शहरासह ग्रामीण भागात आता अन्नपाण्याासाठी मोकाट जनावरे रस्त्यावर येऊ लागली आहेत. काही ठिकाणी पांजरपोळ आहेत, तर बळीराजाने आपली जनावरे मोकाट सोडल्याने त्यांच्या अन्नपाण्याची जबाबदारी अनेक सामाजिक संस्था तसेच प्राणीमित्र आणि पशुप्रेमी घेताना दिसत आहेत. सध्याच्या लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरी भागासह ग्रामीण …
Read More »Monthly Archives: May 2020
पोलीस हेडकॉन्स्टेबलची कोरोनावर मात
पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल सेक्टर 13 येथे राहणारे आणि मानखुर्द पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले संतोष अंबाजी भगत यांनी 23 मार्च रोजी ताप आल्याने व कोरोनासंबंधीची लक्षणे दिसू लागल्यामुळे तातडीने खारघरमधील ग्रामविकास भवनात वैद्यकीय तपासणी करून घेतली. तेथे कॉन्स्टेबल संतोष भगत यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पनवेल महापालिकेच्या …
Read More »सामाजिक अंतर राखून नवदाम्पत्याचे सात फेरे; शिवकर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
पनवेल ः वार्ताहर जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ज्यांची लग्न जमली आहेत, त्यांच्यामध्ये एकप्रकारे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यासाठी शिवकर ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावातील मुलींचे जमलेले विवाह लावून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या वरच्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. मंगळवारी या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आणखी एक विवाह पार पडला. या …
Read More »जनावरांच्या चार्यासाठी शेतकर्यांची भटकंती
मोहोपाडा : प्रतिनिधी ग्रामीण भागात जनावरांच्या वैरणाचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकर्यांच्या संसाराला हातभार लावणारी पाळीव जनावरे रणरणत्या उन्हाळ्यात सांभाळणे मोठ्या जोखमीचे झाले आहे. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी तसेच वैरण निर्माण होत नसल्याने जनावरे जगविण्यासाठी पेंढा विकत घ्यावा लागत असून शेकडा 400 ते 500 रुपये मोजावे लागतात. चारा टंचाईची …
Read More »इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरची आयुक्तांकडून पाहणी
नवी मुंबई : बातमीदार काही दिवसांपूर्वी पनवेल येथील इंडिया बुल्स कोविड केअर सेंटरमधील संशयित नागरिकांनी नवी मुंबई पालिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. वेळेवर जेवण मिळत नाही, तसेच कचरा जमा झालेला असतो. दररोज तपासणी केली जात नाही, असे विविध आक्षेप घेण्यात आले होते. अखेर आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या सेंटरला भेट …
Read More »खोपोलीतील ‘त्या’ मुलाबाबत उलगडा
आई रागावल्याने घर सोडून आला होता खोपोली : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळात अनेक सुखद, तर कधी मन हेलावणार्या घटना घडत असून, खालापुरात रस्त्याच्या कडेला प्रसुती झालेल्या बाळाचे कोडकौतुक सुरू असताना दुसर्या घटनेत रागात घर सोडून आलेल्या 12 वर्षांच्या मुलाची तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी मुंब्र्यातील आई-वडिलांशी संपर्क करून दिला आहे. आई …
Read More »जागतिक आरोग्य संघटनेकडून खाण्या-पिण्याबाबत गाईडलाईन
कोरोना व्हायरसबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (व्हू)ने वेगवेगळ्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता आणि सुरक्षेबाबत वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत. आता ‘व्हू’कडून खाद्यपदार्थांबाबत काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना पाळणे सोशल डिस्टन्सिंगएवढेच गरजेचे आहे. जेवण तयार करताना किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाला हात लावण्याआधी हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करावेत. …
Read More »कर्जत रोटरी क्लबतर्फे मास्क, सॅनिटायझरचे वाटप
कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून, पोलीस, नगर परिषद कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यांच्यासह रस्त्यावर भाजी विके्रत्यांना रोटरी क्लब ऑफ कर्जतच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी चारफाटा, श्रीराम पूल, बाजारपेठ आदी ठिकाणी बंदोबस्तासाठी आहेत अश्या कर्मचार्यांना, तसेच नगर …
Read More »रोह्यातून कर्नाटक, गुजरातला मजूर रवाना
रोहे : प्रतिनिधी – शासनाने परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी व्यवस्था केली असून, टप्प्याटप्प्याने या मजुरांना आपल्या राज्याकडे सोडले जात आहे. यातील काही रेल्वेने जात आहेत, तर काहींना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने सोडले जात आहे. अशाच प्रकारे रोह्यातून गुजरात राज्यात 32, तर कर्नाटक राज्यात 80 मजुरांना मंगळवारी (दि. 12) दुपारी …
Read More »गावांपासून कोरोना लांब ठेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 11) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे, …
Read More »