Breaking News

Monthly Archives: May 2020

नवी मुंबई, उरणच्या पाणथळ जागांचे संरक्षण आवश्यक

सिडको अधिकारी व जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे आदेश उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे, डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कुल, एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी दुर्मिळ पक्षांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणार्‍या मॅन्ग्रोजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या पाणथळी, दळी जमिनींच्या संरक्षण, सवंर्धनाची …

Read More »

महाडमध्ये परप्रांतिय कामगाराला कोरोना

तालुक्यात उडाली खळबळ महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यातील बिरवाडीपाठोपाठ सवाणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शेलटोली गावात राहात असलेल्या एका 45 वर्षीय परप्रांतिय कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला यापूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. महाड तालुक्यातील शेलटोली गाव …

Read More »

अत्यावश्यक सेवा देणार्यांना पारदर्शक फेस शिल्डचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर शासनाने लॉकडाऊन जारी केले आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नसल्याने सफाई कामगार, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी मोठी कामगिरी बजावत आहेत. हे काम करताना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी या सर्व अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना आय फ्लेक्स टेक्नॉलॉजिसचे डायरेक्टर …

Read More »

उरणच्या ‘इंडियन ऑइल’कडून 10 लाख रुपयांची मदत

अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात गहिर्‍या होणार्‍या कोरोनासंकटाशी लढा देणार्‍या अलिबाग जिल्हा प्रशासनाच्या मदतीस उरण येथील इंडियन ऑइलटँकिंग कंपनीने हातभार लावत दहा लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कार्यालयात भेट देऊन ही मदत सुपुर्द केली. यापूर्वी कोरोनाची टाळेबंदी जाहीर झाल्यावर कंपनीने उरण तालुक्यातील आपल्या टर्मिनलजवळील गावांमध्ये …

Read More »

प्रजापिता ब्रह्माकुमारीजकडून जेवण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील प्रजापिता ब्रह्माकुमारिज विश्वविद्यालया ईश्वरीय सेवा केंद्र यांजकडून नवीन पनवेल सेक्टर 16 पोदी येथे 225 जणांना जेवण देण्यात आले. या वेळी पनवेल सेवा केंद्रप्रमुख तारादीदी, डॉ. शुभदा नील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे, तसेच सेवा केंद्रातील अनेक जण उपस्थित होते. लॉकडाऊनमध्ये उपाशी असलेल्यांना …

Read More »

खालापूर भाजपने जपली माणुसकी

खोपोली : प्रतिनिधी परप्रांतीयांची मूळगावी जाण्यासाठी होणारी फरफट पाहून खालापूरातील भाजप पुढे सरसावली आहे. तालुक्याचे अध्यक्ष बापू घारे, राकेश गव्हाणकर, अनिल उत्तेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य कर्मचार्‍यांना सहाय्य केले. तसेच वावोशी हद्दीतील आदिवासी वस्तीत ग्रामपंचायतचे भाजपचे सदस्य महेश कडू तसेच जिल्हा परिषद …

Read More »

ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचार्यांना विमा संरक्षणाची फक्त घोषणाच!

अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने नाराजी पनवेल : बातमीदार ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचा आरोप ग्रामसेवक करत आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस हे सर्वजण आपला जीव धोक्यात …

Read More »

कळंबोली : प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांनी लॉकडाऊन काळात प्रभागातील 600 हुन अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आली.

Read More »

पनवेल : भारत विकास परिषद या संस्थेच्या वतीने रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाला 30 पीपीई किट देणगी म्हणून देण्यात आली.

Read More »

लॉकडाऊनमुळे पीरवाडी किनारा सामसूम

उरण : वार्ताहर उरण शहराच्या पश्चिमेस असलेल्या पीरवाडी समुद्र किनारा एप्रिल व मे महिन्यात पर्यटकांनी फुलून जात असे. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या छोटया व्यवसाईक यांना उदरनिर्वाह साधन  होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्यामुळे छोट्या टपरी धारकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. उरण शहराच्या पश्चिमेस असलेल्या निसर्ग रम्य …

Read More »