पनवेल : बातमीदार – नवी मुंबईतील मोठ्या सार्वजनिक मंडळांनी 11 दिवसांऐवजी दीड ते पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळांनी लहान गणेशमूर्तीचे पूजन करून कृत्रिम तलावात विसर्जन करावयाचे नियोजन आखले आहे. शहरातील काही गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमावर भर दिला आहे. यात तुर्भेतील शिवछाया मित्रमंडळाने यंदा दीड …
Read More »Monthly Archives: July 2020
सीकेटी महाविद्यालयात बीएमएस मेरिटाइम लॉजिस्टिक्स अभ्यासक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त – जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे देश व जगभरात व्यवस्थापन क्षेत्रातील बदलाचा वेध घेत रोजगार प्रशिक्षण आधारित पदवी मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) मेरिटाइम लॉजिस्टिक्स असे या …
Read More »मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली
नवी मुंबईकरांवर पाणीसंकट? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – जुलै महिना संपत आला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषत: नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईनंतर राज्यात …
Read More »कर्जत, खोपोली भाजप युवा मोर्चाने पाठविली जय श्रीराम लिहिलेली पत्रे
कर्जत : बातमीदारप्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का, असे वादग्रस्त विधान नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी असंख्य पत्रे भाजप युवा मोर्चाकडून पवारांना पाठविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे कर्जत भाजप युवा मोर्चाकडून पत्रे पोस्ट करण्यात आली. या अभियानावेळी कर्जत पोष्ट …
Read More »माणगावमधील वादळग्रस्तांना नुकसानभरपाई केव्हा मिळणार?
ज्ञानदेव पवारांचा महाआघाडी सरकारला घरचा आहेर माणगाव : प्रतिनिधीमाणगाव तालुक्यातील वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई केव्हा मिळणार, असा सवाल काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार यांनी उपस्थित केला आहे. यानिमित्ताने त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात …
Read More »राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री एक ‘मातोश्री’वर आणि दुसरे महाराष्ट्रभर फिरत आहेत
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला पुणे : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दै. सामनाला विशेष मुलाखत दिली. माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत दुसर्या वाहिनीला मुलाखत देऊन दाखवाच, असे म्हणत पलटवार केला आहे. त्याचप्रमाणे …
Read More »रायगड जिल्ह्यात 449 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 449 नव्या रुग्णांची नोंद रविवारी (दि. 26) झाली असून, नऊ जण दगावले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील (महापालिका 135, ग्रामीण 52) 187, खालापूर 63, रोहा 35, उरण 30, माणगाव 28, पेण 23, महाड 19, अलिबाग 18, कर्जत 16, मुरूड 14, सुधागड सहा, पोलादपूर चार, …
Read More »कोरोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारताचा अन् नाविण्यतेचा स्वातंत्र्यदिनी संकल्प करूया
पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टी पुढे आल्या आहेत, मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनी कोरोनाशी लढण्याचा, स्वावलंबी भारत बनवण्याचा आणि नवे शिकण्याचा व शिकविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले …
Read More »मुलाखतींचा खटाटोप
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने भर पडत आहे. अशा वेळी या महामारीवर राज्यकर्त्यांकडून पूर्ण क्षमतेने उपाययोजना करणे अपेक्षित असताना तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइक त्रस्त आहेत. असे असताना मुलाखतींचा घाट घालून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. मुलाखत घेऊन …
Read More »रायगडात आघाडीत बिघाडी
नव्याची नवलाई सरल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सातत्याने खटके उडू लागले आहेत. असमन्वयाने सुरू झालेल्या नाराजीचे रूपांतर एव्हाना वाद-विवादात झाले असून, महाआघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्या परस्परविरोधी भूमिका प्रकर्षाने समोर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद तर मुख्यमंत्र्यांपुढे पोहोचला. …
Read More »