उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले आहे. पाऊस आणि डोंगरमाथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणार्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहत असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रंजित बिरजे यांनी दिली. उरण तालुक्यातील 52 गावे, उरण शहर आणि काही औद्योगिक विभागाला रानसई धरणातून …
Read More »Monthly Archives: July 2020
नवीन पनवेलच्या भुयारी मार्गात साचतेय पाणी
अपघाताला निमंत्रण; रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गाच्या कामात असलेल्या तांत्रिक चुकांमुळे त्यामध्ये पाणी साचत असून, या साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांना गाडी चालवण्यास भाग पडत असल्याने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असताना रेल्वे …
Read More »शासनाकडून निराधारांची उपेक्षा!
अपंग-विधवांना श्रावणबाळ पेन्शन योजनेची प्रतीक्षा कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणारी अशासकीय समिती बनविण्यात आली नाही. परिणामी समिती नसल्याने लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करता आले नाहीत. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी असलेल्या सभासदांना शासनाला श्रावणबाळ योजनेमधून मदत देता आली नाही. …
Read More »कोरोनाग्रस्तांसाठी भाजप सरसावला
आमदार मंदा म्हात्रे यांच्या निधीतून नवी मुंबई पालिकेला तीन रुग्णवाहिका सुपूर्द नवी मुंबई : बातमीदार – संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबईतील नागरिकांना रुग्णवाहिकांची कमतरता भासू नये, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार निधीतून तीन सुसज्ज अशा …
Read More »राम मंदिराची उभारणी
अयोध्येत राम मंदिराच्या बहुप्रतिक्षित शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे’ ही घोषणा आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. राम मंदिर …
Read More »कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात बजरंग दलाकडून रक्तदान शिबिर
कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा होत असून त्यात कोरोना रुग्णांचा जीव जात आहेत. या रुग्णांना जीवनदान मिळावे म्हणून विश्वहिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कळंबोली समित्यांच्या वतीने सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या सभागृहात एमजीएम रूग्णालय कामोठ्याच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 19) आयोजित करण्यात आले होते. बजरंग दल कळंबोली समितीच्या …
Read More »तळोजा परिसरात इमारतीला आग
बालकासह परिवाराचे जवानांनी वाचवले प्राण पनवेल : वार्ताहर तळोजा येथील एका इमारतीत रविवारी (दि. 19) लागलेल्या आगीत नऊ महिन्यांच्या बालकासह त्याचा परिवार जवळपास एक तास आत अडकला होता. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तळोजा फेज-1 से.-11 येथे एके प्लाझा या …
Read More »खालापुरातील आरोग्य यंत्रणेची पोलखोल
खालापूर : प्रतिनिधी वर्षानुवर्ष व्हेंटीलेटरवर असलेली खालापूर तालुक्यातील आरोग्य सेवेचा पंचनामा कोरोनानी मांडला असून कोरोनामुळे पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या थैमानात व्हेंटीलेटरची, बेडची सोय प्रशासन करू शकलेले नाही. नियमावर बोट दाखवत रूग्णांच्या जिवाशी खेळ मात्र सुरूच आहे. यामुळे राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. कोरोना महामारीच संकटापूर्वी देखील तालुक्यातील रूग्णालये …
Read More »रोहा तालुक्यात 27 नवीन रुग्ण
रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात रविवारी 27 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. तर कोरोना संसर्गमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधीतांची संख्या 337 वर पोहचली आहे. आतापर्यंत 269 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गमुळे आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रोहा तालुक्यात …
Read More »पनवेल तालुक्यात 181 नवे कोरोनाग्रस्त
पाच जणांचा मृत्यू; 117 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 19) कोरोनाचे 181 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 117 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 98 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper