मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का, असा सवाल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर या …
Read More »Monthly Archives: July 2020
राज्यात दिशा कायदा कधी अंमलात येणार?
क्वारंटाइन सेंटरमधील बलात्कारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल पनवेल : प्रतिनिधीकोरोना रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाइन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केला ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना असून, त्यामुळे कोरोनो सेंटरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपीसोबतच येथील सुरक्षेची जबाबदारी असणारे रक्षक …
Read More »रायगड जिल्ह्यात 351 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 351 रुग्णांची नोंद शनिवारी (दि. 18) झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 183 (महापालिका 125 व ग्रामीण 58), खालापूर 45, अलिबाग 35, पेण 32, उरण 29, महाड 16, कर्जत नऊ आणि श्रीवर्धन तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, तर मृत …
Read More »तळोजा सबवे सुरू करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1ला जोडणार्या सबवेमध्ये साचणार्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करून तो लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, तळोजा फेज 1ला जोडण्यासाठी …
Read More »रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल
दुकानांना पाच तासांची मुभा अलिबाग : प्रतिनिधीपनवेलपाठोपाठ उर्वरित रायगड जिल्ह्यातही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मर्यादित वेळेपुरती सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. …
Read More »किल्ले रायगडावरील हत्ती तलावाचे जलपूजन
महाड : प्रतिनिधीकिल्ले रायगडवरील हत्ती तलाव दुरुस्तीनंतर पूर्णपणे भरला असून, या ऐतिहासिक घटनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेले रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या तलावाचे जलपूजन केले.हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर संवर्धनाचे काम सुरू असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश येऊन गडावरील दुरुस्ती केलेले तलाव …
Read More »पनवेल तालुक्यात 183 जण पॉझिटिव्ह
तिघांचा मृत्यू; 222 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 18) कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 222 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 125 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू …
Read More »कोरोनाग्रस्तांना योगसाधनेचे धडे
नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी व रिसर्च सेन्टरतर्फे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्त नागरिकांना योगसाधनेचे धडे देण्यात येत आहे. कोरोनाला दूर सारण्यासाठी रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे हेच ओळखून डॉ. स्वामी योगप्रताप व डॉ. दीपा काला यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना बेडवर बसवून योग प्रशिक्षण देत …
Read More »नवी मुंबई बँक दरोडाप्रकरणी तिघांना अटक
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईच्या कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवर दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबई परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांची सराईत टोळी असल्याचेही कळते. सारस्वत बँकेच्या कोपर खैरणे सेक्टर 19 येथील शाखेवर गुरुवारी दुपारी दरोडा पडला होता. बँकेत आलेल्या अज्ञात दोघांनी …
Read More »पनवेलमध्ये अज्ञात त्रिकुटाने अॅम्ब्युलन्सचालकाला लुटले
पनवेल : वार्ताहर – रिक्षामधून आलेल्या अज्ञात त्रिकुटाने अपघातग्रस्त अॅम्ब्युलन्स चालकाला मारहाण करुन त्याच्याजवळ असलेल्या रोख रक्कमेसह मोबाइल फोन व टॅब असा सुमारे 33 हजारांचा ऐवज लुटुन पोबारा केल्याची घटना पनवेल येथे घडली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. …
Read More »