पनवेल : बातमीदार वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे शक्य नाही. त्यामुळे तेथून कोरोनाची साखळी वाढू नये, यासाठी आता बाजार समितीतही प्रतिजन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजवर 30 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. यातील दोघांचा अहवाल सकारात्मक आला आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी …
Read More »Monthly Archives: July 2020
महावितरण कार्यालयात गर्दी; वीज बिलांमध्ये सूट देण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार कोरोनामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महावितरणच्या माध्यमातून मीटर रिडींग न घेता सरासरी वीज बिले आकारण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पारलेला होता. जुलै महिन्यात रिडींगनुसार आकारण्यात आलेली वीज बिले जास्त रकमेची असल्याने पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चौकशीसाठी नागरिक महावितरणच्या कार्यालयात गर्दी करीत असून आवाढव्य आकारण्यात …
Read More »खारघरमध्ये फिरत्या प्रयोगशाळा
पनवेल : बातमीदार पनवेल पालिका हद्दीत स्थानिक पातळीवर मोठ्या संख्येने कोरोना चाचण्या (आरटीपीसीआर) करण्यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. यातील पहिली फिरती प्रयोगशाळा शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाखाली सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दोन दिवसांपासून ठाणे येथील मिलेनियम लॅबोरेटरीज आणि पनवेल येथील अॅरोहेड लॅबोरेटरीज या दोनही प्रयोगशाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन …
Read More »15 दिवसांत कोरोना आटोक्यात!; नवी मुंबई पालिका प्रशासनाचा दावा
पनवेल : बातमीदार पालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीनंतरही नवी मुंबई शहरात दिवसेदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या सर्वाच्या चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. तरीही या उच्चतम रुग्णसंख्येनंतर दोन आठवडयांत करोना संख्या आटोक्यात येईल, असा आशावाद पालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईत 13 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असल्याने घरी …
Read More »नवी मुंबईत घरोघरी मास स्क्रिनिंग; पन्नाशीच्या आतील शिक्षकांवर जबाबदारी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई क्षेत्रात सध्या कोरोनाने कहर केला आहे. मात्र सध्या नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ब्रेक दि चेन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली असली तरी 42 कंटेन्मेंट झोनमध्ये घरोघरी स्क्रिनिंग करण्यास सुरुवात झाली आहे. या कामासाठी खासगी अनुदानित व नवी …
Read More »ऑनलाइन काव्यसंमेलनाचा दशकपूर्ती सोहळा
मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी माणगाव : प्रतिनिधी – कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट या समुहातर्फे नुकतेच ऑनलाइन कविसंमेलन पर्वाचा दशकपूर्ती सोहळा राज्यातील मान्यवर कवींच्या सादरीकरणाने समृद्ध झाला. या कविसंमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्ष अशोक ठाकूर, विशेष निमंत्रित कार्याध्यक्ष नमिता …
Read More »श्रीवर्धन आगारातून लांब पल्ल्याच्या बस सुरू करण्याची मागणी
श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन परिवहन आगारातून 1 ऑगस्टपासून लांब पल्ल्याच्या सर्व बसफेर्या सुरू करण्यात याव्या, अशी मागणी प्रवासीवर्गामधून होऊ लागली आहे. अनेक नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे लोक बसगाड्या केव्हा सुरू होतील याची वाट पाहत आहेत. श्रीवर्धन आगारातून दररोज मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, …
Read More »माथेरानच्या जंगलात रात्रीची गस्त
शिकार्यांना पकडण्यासाठी वन विभाग सतर्क कर्जत : बातमीदार – माथेरानच्या जंगलात आणि डोंगरपट्ट्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क झाला असून, शिकार्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे. माथेरान येथील जंगल …
Read More »विमनस्क वृद्धावर वैद्यकीय उपचार
पोलादपूर पोलीस, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचार्यांची मानवसेवा पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे गेल्या महिनाभरापासून विमनस्क अवस्थेत फिरणार्या वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर पोलादपूर पोलीस आणि लोहारे ग्रामस्थांनी त्याला खासगी टेम्पोमधून ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. कोरोना शब्द माहिती नसलेल्या या वृद्धाबाबत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी थोड्याशा कटूतेनंतरही …
Read More »गणेशमूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका
पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अनेक मंडळांनी दीड ते पाच दिवसांच्या व लहान गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आर्थिक फटका गणेश मूर्तिकारांना बसणार आहे. गणेशमूर्तीची उंची हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेवढी मूर्ती मोठी, तेवढी जास्त प्रसिद्धी …
Read More »