Breaking News

Monthly Archives: August 2020

भाजपतर्फे ओवे गावात गणेशभक्तांना धान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सव गोड व्हावा म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजप पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबीयांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने ओवे गावात …

Read More »

विद्यार्थ्यांवरील अमानूष मारहाणीचा जाहीर निषेध -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर – गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भरातील विद्यार्थी परीक्षा न घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोना मुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे अशा रास्त मागण्या करत आहेत. धुळे येथे याच मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार …

Read More »

फळ मार्केटकडे नागरिकांची पाठ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सव काळात सफरचंदाची आवक घसरली असून, बाजारभाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये सफरचंद 140 ते 200 रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर फळांचे दरही वाढले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी उत्सव काळातही फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक …

Read More »

रायगडात 489 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 26) 489 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू  झाला. दुसरीकडे 393 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, उरण तीन, खालापूर दोन तसेच पेण, अलिबाग, सुधागड, महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल …

Read More »

खोपोलीतील जुन्या इमारतींच्या बांधकामाचे ऑडिट होण्याची गरज

खोपोली : प्रतिनिधी सोमवारी महाड येथील पाच मजली रहिवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. याची दखल घेत खोपोली शहरातील पंधरा  वर्षा वरील जुन्या रहिवासी इमारतीचे बांधकाम मजबुती ऑडिट होण्याची गरज सामाजिक संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. खोपोली शहरातही माती भराव टाकून टोलेजंग रहिवासी संकुले उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. अनेक …

Read More »

पनवेल तालुक्यात 252 कोरोनाबाधित; पाच रुग्णांचा मृत्यू; 209 जणांची संसर्गावर मात

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 26) कोरोनाचे 252 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 190 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला, तर 175 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले …

Read More »

आर्थिक उलाढालींना बळ हवे

जगभरात अद्यापही कोरोना विषाणूचे थैमान चिंताजनकरित्या सुरूच आहे. भारतात या महामारीतून बरे होणार्‍यांचे प्रमाण एव्हाना 76 टक्क्यांवर गेल्याने महामारीचा आलेख स्थिरावल्यासारखे भासते आहे. एकीकडे कोरोनासंबंधी चाचण्यांची संख्या वाढवूनही नव्याने नोंदल्या जाणार्‍या पॉझिटिव्ह केसेसचे प्रमाण खाली आले आहे, तर मृत्यू दर आणखी खाली गेला आहे या सर्वच बाबी दिलासादायक आहेत. त्यामुळेच …

Read More »

रायगड जिल्ह्यात घरोघरी गौरीपूजन

सुवासिनींनी घेतला ओवसा कर्जत ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात गौरी-गणपती सणाला फार महत्त्व आहे. या सणाला कुठेही असलेला माणूस आपल्या घरी येतो. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली हा …

Read More »

सिंधुदुर्गातील विद्यार्थिनीला पंतप्रधानांचा मदतीचा हात

मुंबई ः प्रतिनिधीइंटरनेट कनेक्शन व पुरेशा सुविधा नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलीला ऑनलाइन लेक्चर्सच्या माध्यमातून शिक्षणास अडचणी येत होत्या. या संदर्भातील फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलीची मदत केली आहे. सिंधुदुर्गमधील दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या मुलीचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात ही मुलगी एका छोट्या …

Read More »

करळ-सावरखारचे उपसरपंच प्रवीण घरत यांचा भाजपत प्रवेश

उरण ः वार्ताहर उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत करळ-सावरखारचे विद्यमान उपसरपंच प्रवीण गजानन घरत यांनी बुधवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी प्रवीण घरत यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांनी त्यांचे …

Read More »