Breaking News

Monthly Archives: August 2020

पुण्यातील मानाच्या गणपतींचे यंदा उत्सव मंडपातच होणार विसर्जन

पुणे : प्रतिनिधी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गणरायाच्या मूर्तीचे विसर्जनदेखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडपातच केले जाणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली. मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे …

Read More »

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

मुंबई : प्रतिनिधी महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच मुंबईतील नागपाडा परिसरात एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी घडली. या ढिगार्‍याखाली चार जण अडकल्याचे वृत्त असून बचावकार्य सुरू आहे.दक्षिण मुंबईतील नागपाड्यात असलेल्या शुक्लाजी मार्गावरील तीन मजली इमारतीचा भाग गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेल्या ढिगार्‍याखाली चार …

Read More »

‘…तर मुंबईत लोकलसेवा पूर्ववत होईल’

मुंबई : लोकलसेवा नियमितपणे सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मध्य रेल्वेने दिली आहे. लोकल कधी सुरू केली जाणार, या प्रश्नाचे उत्तर आताच मिळाले नसले तरी ते लवकरच मिळू शकते, असे संकेत मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी लोकल सुरू …

Read More »

रायगडात एनडीआरएफची टीम कायम तैनात असावी; जिल्हा प्रशासनाचा राज्य शासनाला प्रस्ताव

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात निर्माण होणारी आपत्तीजनक स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात एनडीआरएफची टीम कायम तैनात असावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनासमोर ठेवला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. रायगडसह कोकणाला अनेकदा आपत्तीजनक स्थितीला सामोरे जावे लागते. 2005मधील अतिवृष्टीने दरडी कोसळून झालेली जीवितहानी व 2016मध्ये सावित्री पूल दुर्घटनेत …

Read More »

गणेशोत्सवातून कोरोनासंदर्भात प्रबोधन; नागोठण्यातील श्री सन्मित्र मित्र मंडळाची जनजागृती

नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागोठणे येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात कोविड-19 प्रतिबंधक फलक लावून जनजागृती केली आहे. या मंडळाचे यंदाचे 47वे वर्ष असून, तीन वर्षांनंतर सुवर्ण महोत्सव आगळावेगळा व्हावा या दृष्टीने मंडळाचे सर्वच सदस्य आतापासूनच कामाला लागले आहेत. नागोठणे येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची …

Read More »

रायगडात 454 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 27) 454 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 441 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 263, पेण 36, अलिबाग 33, खालापूर 29, माणगाव 26, रोहा व महाड प्रत्येकी 16, उरण 14, कर्जत 10, पोलादपूर चार, …

Read More »

सीझेडएमपी तरतुदीनुसार मंजूर प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको प्राधीकरणाकडून सीझेडएमपी 1991 व 2011मधील तरतुदीस अनुसरून मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिडको प्राधीकरणाकडून 12.5 टक्के योजनेंतर्गत वाटप …

Read More »

पुढच्या वर्षी लवकर या…! गौरी-गणपतीला भाविकांकडून भावपूर्ण निरोप

अलिबाग : प्रतिनिधी पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडका बाप्पा तसेच गौरीमातेला भाविकांकडून गुरुवारी (दि. 27) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम व अटींचे पालन करून पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत विसर्जन करण्यात आले.ज्याच्या आगमनाची भाविक आतुरतेने वाट पाहत होते त्या सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे शनिवारी घरोघरी …

Read More »

‘सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली’

नवी दिल्ली : सुरक्षा क्षेत्रात सुविधांची निर्मिती करण्यात आत्मनिर्भर होण्याची आमची कटिबद्धता फक्त चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही, तर त्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते सुरक्षा परिषदेत बोलत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून शस्त्रांच्या कारखान्यांना सरकारी विभागाप्रमाणे चालवले जात होते. एका मर्यादित दृष्टिकोनामुळे …

Read More »

पाणीचिंता मिटली!

मोरबे धरणात जून 2021 पर्यंत पुरेल एवढा जलसाठा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात शंभर टक्के पाणीसाठा झालेल्या मोरबे धरणात या वर्षी ऑगस्ट महिना संपला तरी 82 टक्केच पाणीसाठा झाला आहे. हा साठा नवी मुंबईकरांना 7 जूनपर्यंत पुरेल इतका असल्याने पाणीचिंता मात्र मिटली आहे. मोरबे …

Read More »