Breaking News

Monthly Archives: August 2020

रायगडात 535 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात तब्बल 535 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी (दि. 20) झाली. त्याचबरोबर 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 267, पेण 43, अलिबाग 41, माणगाव 38, रोहा व महाड प्रत्येकी 31, खालापूर 24, कर्जत 22, उरण 16, …

Read More »

शासकीय कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरानमध्ये कोविडचा प्रदुभाव रोखण्याकरिता नगरपालिकेने येथील शासकीय कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी घेऊन परिपूर्ण खबरदारी घेतली आहे. यामध्ये नगरपालिका कर्मचारी, पोलीस, महसूल विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. माथेरान हे जगविख्यात पर्यटनस्थळ असल्याने येथे लाखो पर्यटक भेट देतात. मागील सहा महिन्यांपासून कोविडमुळे माथेरान लॉकडाऊन आहे, मात्र माथेरानबाहेरून येणार्‍या …

Read More »

तरुणांनी बनविली पर्यावरणपूरक मकर

माणगाव ः प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मकरांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यापूर्वी त्यासाठी प्लास्टिक, थर्माकोल आदी वस्तूंचा वापर होत होता. त्यामुळे पर्यावरणाला या घटकांचा धोका होता. यावर उपाय म्हणून लॉकडाऊन काळात शहरी भागातून गावाकडे आलेल्या तरुणांनी टाकावूतून टिकाऊ व पर्यावरणपूरक अशी मकर बनविली आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या पुठ्ठ्यांचा वापर करून आकर्षक नक्षीकाम …

Read More »

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन; भंडारी बहुद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब पनवेलचा उपक्रम

अलिबाग ः प्रतिनिधी अगदी काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची घरोघरी लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळते. कोरोनाच्या काळातही भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही. आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी घरोघरी सजावट सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारी बहुद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग व रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे रायगड जिल्ह्यामध्ये घरगुती गणेशोत्सव व सजावट स्पर्धेचे आयोजन …

Read More »

अलिबाग आगारातून मुंबई-पुणे बससेवा सुरू

अलिबाग ः प्रतिनिधी  अलिबाग एसटी आगारातून गुरुवारपासून (दि. 20) आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी अलिबाग-मुंबई, अलिबाग-पुणे अशा सेवा सुरू करण्यात आल्या. मुंबईसाठी दिवसातून तीन, तर पुण्यासाठी एक फेरी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने फेर्‍या वाढविण्यात येणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून राज्यातील एसटी सेवा …

Read More »

भोरमाळ येथील मुलाला विषबाधा; समाजसेवकाचा मदतीचा हात

पेण ः प्रतिनिधी आपल्या वडिलांसोबत शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या मुलास गवत मारण्याच्या विषारी औषधातून विषबाधा झाल्याची घटना पेण तालुक्यातील कामाली भोरमाळ आदिवासीवाडी येथे घडली आहे. तुकाराम कडू हे रविवारी (दि.16) सायंकाळी 4 वाजता आपल्या शेतावर गवत मारण्याचे औषध फवारणीसाठी गेले होते. आपल्यासोबत ते आपल्या अथर्व कडू या मुलालाही घेऊन गेले, …

Read More »

कोंडीवासीय भोगताहेत मरणयातना; रस्त्याची दुरवस्था; ग्रामस्थ मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत

पाली ः प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे उलटूनही सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडा येथील नागरिकांना पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय. दुर्गम ठिकाणी वसलेले आणि हातावर पोट असलेल्या गरिबांचे हे गाव आहे. आजही येथील लोक दारिद्य्रावस्थेत जगत मरणयातना भोगत आहेत. गावापर्यंत एसटीची सुविधा नाही. येथून जवळपास चार-साडेचार किमी अंतरावर नागशेत गावाला एसटी येते, …

Read More »

शेतकर्‍यांचा आवाज शासनदरबारी पोहचविणार; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ग्वाही; प्रकल्पग्रस्तांचे उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनबाधित शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून दिला जाईल, असा शब्द विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिल्याने शेतकर्‍यांनी सुरू केलेले साखळी उपोषण स्थगित केले आहे. येत्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा आणि मंत्रालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी, रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनी आणि शासनाने …

Read More »

पळून गेलेल्या मुलीवर बलात्कार

पनवेल : बॉयफ्रेन्डसोबत पळून गेलेल्या 17 वर्षीय मुलीवर त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,17 वर्षीय मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. या मुलीला खारघरमधील फ्लॅटमध्ये नेले होते. तिथे तिला पावडर म्हणून ड्रग्ज देण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सध्या तिचे समुपदेशन केले जात आहे. …

Read More »

भक्तांकडून लहान गणेशमूर्तींना प्राधान्य

पनवेल : बातमीदार कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी घरगुती गणेशोत्सव करणारे आणि सार्वजनिक मंडळांनीही यंदा कमी उंचीच्या गणेश मूर्ती स्थापन करण्यास पसंती दिली आहे. गणेशभक्त यंदा सहज विरघळणार्‍या शाडू मातीच्या आणि लहान मूर्तींचा आग्रह धरत असल्याची माहिती येथील मूर्तिकार यांनी …

Read More »