रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा ग्रामपंचायतीने अंधाराचे साम्राज्य दूर करताना नव्याने पथदिव्यांच्या प्रकाशाची सेवा उपलब्ध केली आहे. एकूण 76 पथदिव्यांच्या प्रकाशाने रेवदंडा ग्रामपंचायतीचे अंतर्गत रस्ते उजळले आहेत. रेवदंडा ग्रामपंचायत अंतर्गत रेवदंडा बायपास रस्ता, साखळे गल्ली रस्ता, नवीन कोळीवाडा वसाहत, मोठ बंदर जे. टी. आणि चौल बांध (स्मशानभूमी रस्ता) या ठिकाणचे अंधाराचे …
Read More »Monthly Archives: November 2020
उरणच्या विद्यार्थ्याने बनविली बॅटरीवर चालणारी सायकल
उरण : रामप्रहर वृत्त – आर्थिकदृष्ट्या बॅटरीवर चालणारी सायकल मित्राला घेणे परवडत नसल्याने येथील अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्या मित्रांनी साहित्य जमा करीत बॅटरीवर चालणारी सायकल बनविली. ही सायकल अवघ्या दोन रुपयांत 25 किलोमीटर अंतर पार करते. आठ महिन्यांपासून कोरोनामुळे शिक्षणही बंद आहे. उरणमधील श्रेयस, शुभम व प्रथमेश या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्या …
Read More »पतसंस्थेच्या ठेवीदारांना विमा प्रमाणपत्र वाटप
नागोठणे ः प्रतिनिधी येथील श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेमध्ये नव्याने ठेवण्यात आलेल्या कायम ठेवीच्या रकमेवर त्या रकमेएवढाच विमा देण्याची नावीन्यपूर्ण योजना संस्थेमार्फत ठेवीदारांसाठी देण्यात येत आहे. त्या योजनेच्या पहिल्या ठेवीदार अरुणा मोरे यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन व सचिव संजय काकडे यांच्या हस्ते विमा प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. या …
Read More »चोरीच्या 34 मोबाइलसह आरोपीला अटक; उलवेमधील घटना
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – घरफोडीप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून उलवेमधील एक गुन्हा उघड झाला असून त्यामधील चोरीचे 34 मोबाइल जप्त केले आहेत. तरूणाची बालवयापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. उलवे येथील बंद घरात घरफोडी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. मोबाइल दुरुस्तीचे काम करणार्या व्यक्तीच्या घरी …
Read More »सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या नगरसेवकपदाची आरक्षण सोडत
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगरपंचायतीच्या 2021मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथील सभागृहात तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. माणगावकरांना त्याची उत्सुकता लागली आहे. माणगाव नगरपंचायतीची मागील निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली. त्या …
Read More »जप्तीची वाहने बनली भंगार
पनवेल : रामप्रहर वृत्त – चोरीला गेलेली वाहने पुन्हा जप्त केल्यानंतर चोरट्यांनी त्यात फेरबदल केल्याचे समोर येते. अशाच प्रकारातून ताबा नाकारल्याने अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात पडून आहेत. निकालाच्या प्रतीक्षेत असलेली ही जप्तीची वाहने भंगार बनली आहेत. पोलीस ठाण्यालाच अपुरी जागा असल्याने जप्तीची वाहने ठेवण्यासाठी जवळपासच्या मोकळ्या जागेचा वापर होत …
Read More »कंत्राटी कामगारांची पगाराविना उपासमार
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; प्रशासनाविरोधात नाराजी कर्जत ः बातमीदार कर्जत उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्या आहार विभागातील सफाई कामगारांना आरोग्य विभागाने मागील पाच महिन्यांपासून पगार दिला नाही. कंत्राटी पद्धतीने काम करणारे हे कामगार कोरोना काळातही न थकता काम करीत आहेत. दरम्यान, या सर्व कामगारांना दिवाळीतही सानुग्रह अनुदान किंवा थकीत पगार दिले …
Read More »मोगली धरणाचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण
रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे आमदार गणेश नाईक यांना आश्वासन नवी मुंबई : बातमीदार – रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे दिघा इलठणपाडा येथील ब्रिटीशकालीन मोगली धरण लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार आहे. माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मुंबई येथे सोमवारी (दि. 23) भेट घेतली. या भेटीत …
Read More »भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबईत मोफत फिरता दवाखाना
नवी मुंबई : बातमीदार – सध्याच्या कोरोना महामारीवर मात करत असताना अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांवर आलेले संकट पाहता तसेच कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेलापूर मतदार संघातील नागरिकांकरिता भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अभिनव उपक्रम राबवत मोफत उपचार देणारा फिरता दवाखान्याची संकल्पना पुढे …
Read More »चला किनारा गाठूया!
लसींची परिणामकारकता, त्यांचा उपयोग, ती कशी आणि कोणाला द्यायची यासंदर्भातील उत्तरे फक्त शास्त्रज्ञच देऊ शकतात. आपण राजकारणी असलो तरी त्या विषयातील तज्ज्ञ नाही हे विसरता कामा नये असा शेलका सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिला. तो बराच बोलका म्हटला पाहिजे. लसीच्या वाटपाबाबत काही राजकीय पक्ष आणि राज्यकर्ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper