Breaking News

Monthly Archives: November 2020

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असे जाहीर करण्यात आले होते, पण कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सेवा सुरू करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.‘डीजीसीए’ने परिपत्रक जारी करून याबाबत आदेश दिले आहेत, मात्र …

Read More »

नव्या कृषी कायद्यांमध्ये बदल होणार नाही!

केंद्र सरकारची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकार नवे कृषी कायदे मागे घेणार नाही. हे तिन्ही कायदे शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास तसेच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. म्हणून या कायद्यांमध्ये बदल करण्याचा प्रश्नच नाही, अशी केंद्र सरकारची स्पष्ट …

Read More »

भाजपपाठोपाठ मनसेचा ‘शॉक’

वाढीव वीज बिलाविरोधात धडकले मोर्चे मुंबई : प्रतिनिधीकोरोना काळातील वीज बिलवाढीविरोधात राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणार्‍या भाजपच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे कार्यकर्ते वीज बिलमाफीची मागणी करीत रस्त्यावर उतरले. यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन …

Read More »

देशाला `वन नेशन, वन इलेक्शन`ची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरूच्चार; संविधान दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाच्या प्रगतीसाठी ’वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (दि. 25) अखिल भारतीय पीठासीन अधिकार्‍यांच्या संमेलनाला संबोधित केले. या वेळी त्यांनी ’वन नेशन, वन इलेक्शन’बद्दल गांभीर्याने विचारमंथन आवश्यक असल्याचे …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

अलिबाग : जिमाका – संविधान दिनानिमीत्त अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच अधिकारी  कर्मचार्‍यांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासह …

Read More »

वाढीव वीज बिले माफ करा!

विविध प्रांत कार्यालयांवर मनसेची धडक कर्जत : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने वाढीव वीज बिल माफ करावे आणि वीज बिलात युनिटमध्ये जी सूट देण्याची घोषणा केली होती तो शब्द पाळावा, या मागणीसाठी कर्जत आणि खालापूर तालुका मनसेच्या  वतीने गुरूवारी (दि. 26) कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. राज्य शासनाने …

Read More »

26/11च्या हल्ल्यातील शहिदांना पनवेल पोलिसांकडून आदरांजली

पनवेल : वार्ताहर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि दहशतवाद्यांशी दोन हात करून आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्वांना विनम्र आदरांजली गुरुवारी (दि. 26) पनवेल शहर पोलिसांनी वाहिली. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम …

Read More »

नवीन पनवेलमधील समस्यांबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाना इशारा

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल मधील समस्यांबाबत  सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाना नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी पत्र देऊन  लोकांचे हिताची व त्याचे जीवितावर बेतणारी कामे 15 डिसेंबर पुर्वी करावीत अन्यथा आपल्या नवीन पनवेल कार्यालयाविरुद्ध मोर्चा अथवा धरणे धरावे लागेल, असा इशारा देताना कोविड-19च्या महामारीच्या काळात त्याची पुर्ण जबाबदारी आपले कार्यालयाची व …

Read More »

भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका अध्यक्षपदी अविनाश गायकवाड

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पनवेल तालुका (ग्रामीण) अध्यक्षपदी विचुंबे येथील अविनाश सुभाष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित प्रशिक्षण वर्गादरम्यान गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.  या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल …

Read More »

वीज बिल कमी करण्यासाठी राज्य सरकारविरोधात मनसेचा मोर्चा

मोहोपाडा : प्रतिनिधी गेले आठ महिने जनता लॉकडाऊनमुळे घरीच अडकलेली असताना आणि आमदनी रूपयाचीही कमाई नसताना राज्य सरकारने लोकांना लॉकडाऊन काळात आलेल्या विज बीलात कोणतीही सवलत मिळणार नाही हे जाहीर केले आणि महाराष्ट्रात असंतोषाचा भडका उडाला. लॉकडाऊन काळात लोकांसाठी रस्त्यावर उतरणार्‍या मनसेने याविरोधात एल्गार पुकारला आणि 26 नोव्हेंबर रोजी राज्यभरातल्या …

Read More »