Breaking News

Monthly Archives: November 2020

खांदा वसाहत परिसरातून तिघांना अग्नीशस्त्रासह अटक

पनवेल : वार्ताहर खांदा वसाहत परिसरातून तीन व्यक्तींना अग्नीशस्त्रासह नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजआड केले असून त्यांच्याकडून जवळपास एक लाख पाच हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. पनवेल परिसरातील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणार्‍या व्यक्तींविरूध्द विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याची मोहीम …

Read More »

नियमांचे पालन करून शाळा होणार सोमवारपासून सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात शाळा सुरू नसल्या तरी शाळांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देणे सुरू …

Read More »

आरोग्य विभाग सतर्क; कोरोना रुग्णवाढीमुळे नवी मुंबईतील अधिकार्यांच्या रजा रद्द

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेने कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबईत दोन दिवसांत करोना रुग्णांची संख्या लक्षवेधी वाढलेली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून दिवसाला प्रतिजन व आरटीपीसीआरच्या चार हजार तपासण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित …

Read More »

ठाकरे महापरिवाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे का?

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल कर्जत : प्रतिनिधीठाकरे महापरिवार अनेक ठिकाणी जमिनी विकत घेत आहे. ते का जमिनी घेतात? त्यांचा जमिनी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे काय, असा प्रश्न पडला आहे. रायगड जिल्ह्यात ठाकरे महापरिवाराने अनेक जमिनी घेतल्या आहेत. कोर्लईमध्ये त्यांनी जागा घेतली. कर्जत तालुक्यातही जागा घेतली आहे. काही जमिनींच्या सर्व्हे …

Read More »

पालीत दिव्यांगांना मिळाला रोजगार

वडापाव व टी स्टॉल सेंटरचे उद्घाटन पाली : प्रतिनिधी दिव्यांग बांधवांना सर्वांगीण दृष्ट्या सक्षम व सधन करण्याच्या उद्देशाने शासन प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. साई-सखा दिव्यांग बचत गटाच्या माध्यमातून पालीत उभारलेल्या वडापाव व टी स्टॉल सेंटर नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे चार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुधागड तालुका …

Read More »

करंजाडे येथे पाण्याचा पंप कार्यन्वित

भाजपचे किरण मुंबईकर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे नोड मधील सेक्टर 2 येथे सिडकोच्या जलकुंभामध्ये एकूण 4 पंप 75 एचपीचे असून, काही दिवसांपुर्वी तिसरा एचपी पंप बंद पडला होता. ही बाब भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी सिडकोच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पंपावर मोटार बसविण्यात येण्याची …

Read More »

भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर आणायचा असा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे. शुद्ध भगवा कोणाचा या मुद्द्यावरुन शिवसेनेवर भाजप टीका करीत आहे. यामध्ये शेलारांनी ट्विटमध्ये म्हटले की, 105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला..कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली..याकुबच्या फाशीला ज्यांनी …

Read More »

वाढीव वीजबिलावरुन शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वीजबिलावरुन विरोधकांचे लक्ष्य ठरलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांनीच टीका केली आहे. मराठा तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री नितीन राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेळ आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत नरेंद्र पाटील म्हणाले …

Read More »

काशिद-बिचवर बुडणार्या चौघांना जीवनदान

मुरुड, रेवदंडा : प्रतिनिधी मुरुड तालुक्यामधील काशीद समुद्र किनारी शुक्रवारी (दि. 20) सकाळीच पुणे येथील काही युवक पुण्याहून पर्यटनासाठी काशिद-बिचवर आले होते. या वेळी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले चार जण पोहता पोहता खोल समुद्रात खेचले गेले व पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. तेथे उपस्थित जीवरक्षकांनी तातडीने पाण्यात उड्या घेतल्या. चार युवकांना बुडत …

Read More »

सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात तसेच नवी मुंबईत सोनसाखळी चोरीप्रकरणी धुमाकूळ घालणार्‍या एका सराईत गुन्हेगारी टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला यश आले असून त्यांच्यामुळे 20 पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस आले आहेत. पनवेलसह नवी मुंबई परिसरातील सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढला होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस …

Read More »