पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाची लागण झाली किंवा नाही याची जलद तपासणी करण्यासाठी पनवेल महापालिकेने खारघरमधील नागरी आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट चाचणी सुरू केली आहे. या चाचणीनंतर अवघ्या 30 मिनिटांत रुग्णास अहवाल प्राप्त होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. खारघर आणि तळोजा परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन …
Read More »Yearly Archives: 2020
अनधिकृत मोबाइल टॉवरवर महापालिकेची धडक कारवाई
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीमधील खारघर प्रभागातील इनामपुरी गावामध्ये एका खासगी जमिनीवर हाय टेन्शन विद्युत वाहिनीच्या बाजूलाच मोबाइल टॉवर उभारण्यात येत होता. याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याबाबत माहिती मिळताच आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने मंगळवारी (दि. 21) संध्याकाळी त्याच्यावर प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी कारवाई करून …
Read More »नौदलाच्या करंजा येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
उरण ः प्रतिनिधी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड व्हाइस एडमिरल अजित कुमार यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 21) पश्चिम नौदल कमांडच्या पहिल्या दोन मेगावॅट (2चथ) कॅपॅसिटी सौरऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. नेव्हल स्टेशन करंजा येथे हा प्रकल्प स्थापित करण्यात आला आहे. तो या प्रदेशातील सर्वांत मोठ्या सौर सयंत्रांपैकी …
Read More »जी. पी. पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन जयराम पाटील यांचे निधन
ठाणे ः प्रतिनिधी जी. पी. पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक जयराम पाटील (79) यांचे कोरोनाच्या प्रादुर्भावाने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. जयराम पाटील हे खारीगावमधील पहिले मॅट्रिक पास होते. कळवे ग्रामपंचायतीचे ते 11 वर्षे …
Read More »महाडमध्ये 22 जणांची कोरोनावर मात; तिघांना लागण
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात भरमसाठ वाढणार्या कोरोनाबाधितांच्या संख्येला ब्रेक लागला असून मंगळवारी (दि. 21) तब्बल 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाड तालुक्यासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. मंगळवारी केवळ तिघांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधितांमध्ये महाडमधील 65 वर्षीय पुरुष, शिंदेकोंड कांबळे तर्फे महाड 26 वर्षीय पुरुष आणि बिरवाडीतील 30 …
Read More »पनवेल तालुक्यात 156 कोरोनाबाधित
तीन जणांचा मृत्यू; 228 रुग्णांची संसर्गावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 21) कोरोनाचे 156 नवीन रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 228 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 112 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 137 …
Read More »डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक
पनवेल ः प्रतिनिधी खारघरमध्ये राहणार्या मामा-भाच्याला पॅनासोनिक कंपनीचे सोलारवर चालणारे एसी विक्रीची डिलरशिप मिळवून देण्याचा बहाणा करून मामा व त्याच्या भाच्याला 85 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरांच्या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या मामा-भाच्याचे नाव नंदकुमार द्विवेदी व …
Read More »लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
मोहोपाडा ः प्रतिनिधी कष्टकरीनगर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी विश्वनाथ गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट बोलून दाखविला. अण्णा भाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत जाऊन स्वतःच्या महत्त्वाकांक्षांवर लिहायला- वाचायला शिकून त्यांच्यामधील प्रतिभावंत विचारांना जागा मोकळी करून दिली. …
Read More »मुरूड समुद्रकिनारी कचर्याचे साम्राज्य
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड समुद्रकिनारी कचर्याचे साम्राज्य झाले असून, समुद्राच्या जोरदार भरतीमुळे समुद्रातील कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात किनार्यावर आला आहे. त्यामुळे जिथे पहावे तिथे कचराच कचरा दिसत आहे कोरोना विषाणूमुळे संचारबंदी असल्याने सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ मुरूड या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने समुद्रकिनारे सुनसान झाले आहेत, परंतु स्थानिक नागरिक या ठिकाणी येत …
Read More »कोविड योद्धे बनून काम करा : रामदास आठवले
पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. आपल्या राज्यासह देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता सर्वांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. नियम पाळा व कोरोनाला टाळा तसेच या संकटात कोविड योद्धे बनून काम करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper