खोपोली : प्रतिनिधी लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करून तिला जबरदस्तीने चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रोशन रामचंद्र कुरंगळे (रा. रिस कांबे, ता. खालापूर) याच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीचे 2017 साली झालेले लग्न मोडले होते. त्यानंतर …
Read More »Yearly Archives: 2020
भाजप महिला मोर्चा पनवेल तालुका मंडल कार्यकारिणी जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी महिला तालुका मंडलाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी लीना पाटील, प्रतिभा भोईर, उपाध्यक्षपदी समिना साठी, रेश्मा शेळके, तनुजा टेंबे, रेखा …
Read More »होळी करा लहान, पोळी करा दान!
‘अंनिस’ रायगड शाखेचे आवाहन पाली ः प्रतिनिधी होळी सण रंगांचा, सण नात्यांचा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरणपूरक साजरा करावा, तसेच होळी लहान करा, पोळी दान करा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन …
Read More »कर्जतच्या दरोड्याचा 24 तासांत छडा
सर्व आठ आरोपींना बेड्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील तिवरे येथील बंद असलेल्या फार्म हाऊसमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न 3 मार्च रोजी झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दरोडेखोरांना 24 तासांत गजाआड केले आहे. तिवरे गावच्या हद्दीत सालब्रो पोल्ट्री फार्म, नाजव्हिला बंगल्यात दरोड्याचा प्रकार घडला होता. गुन्ह्यातील आरोपींनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही …
Read More »पनवेल महापालिकेचा करवाढ नसणारा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2019-20चा सुधारित आणि सन 2020-21चा कोणतीही करवाढ नसणारा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 6) स्थायी समितीत आयुक्त गणेश देशमुख यांनी सादर केला. सदस्यांनी त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याने शुक्रवारची सभा तहकूब करण्यात आली. आता 11 मार्च रोजी होणार्या स्थायी समिती सभेत तो मंजूर करण्यात येईल. …
Read More »महाविकास आघाडीच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांचा भ्रमनिरास; अपयश लपविण्याचा आघाडी सरकारचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 6) सदनात सादर केला. या अर्थसंकल्पात निरनिराळी आश्वासने देण्यात आली आहेत. नव्या सरकारच्या काळात राज्यातील आर्थिक परिस्थिती ढासळली असली तरी अर्थसंकल्पात मात्र निरनिराळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »निर्भयाच्या दोषीची फाशी टाळण्यासाठी धडपड
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आता पुन्हा वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील एक दोषी मुकेशकुमार सिंह याने आपल्या पूर्वीच्या वकिलांवर आरोप करीत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असतो, ही माहिती दिली गेली नाही, असा दावा मुकेशने केला आहे. …
Read More »महिला टी-20 वर्ल्डकप फायनलला पाऊस पडल्यास…
मेलबर्न : वृत्तसंस्था महिला टी-20 वर्ल्डकपचा विजेता होणार याची सर्वांना आता उत्सुकता लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या रविवारी (दि. 8) फायनल रंगणार आहे, पण उपांत्य फेरीप्रमाणे अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पाऊस पडला, तर कोण विजेता होणार, हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. जर विश्वविजेता ठरवायचा असेल तर किमान …
Read More »योगिनी पाटीलची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त बॉक्सिंग खेळातील हिट इंडिया स्पर्धेत कळंबोलीच्या सुधागड हायस्कूलची विद्यार्थिनी योगिनी पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य मुंबई सीटी बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने चेंबूर येथे आयोजित हिट इंडिया राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत सुधागड हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी योगिनी पाटीलने सुवर्णपदक जिंकले. …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिन आणि पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल चेस असोसिएशनच्या माध्यमातून महिलांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा 8 मार्च रोजी अध्यापक महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने खेळली जाईल. प्रत्येक गटात 10 पारितोषिके, तर सर्व सहभागी खेळाडूंना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper