पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेतील सेवकांची विश्वासार्ह अर्थवाहिनी असणार्या रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचा 80वा वर्धापन दिन सोहळा येथील संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. या वेळी संस्थेच्या रायगड विभागातील …
Read More »Monthly Archives: January 2021
मतदार लोकशाहीचा प्राण -तहसीलदार दिलीप रायन्नावर
पाली ः प्रतिनिधी जगातील सर्वांत मोठी सार्वभौम्य लोकशाही असलेला देश म्हणून भारत देशाची ओळख आहे. समानतेची शिकवण लोकशाही देते. अशा लोकशाहीचा प्राण हा मतदार आहे. मतदारांनी जागृत व जबाबदार असले पाहिजे. निःपक्षपातीपणे चांगल्या उमेदवाराला निवडणे हे सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले. येथील ग. …
Read More »रोह्यात विविध सामाजिक प्रतिष्ठान, युवकांचा सन्मान
धाटाव ः प्रतिनिधी डॉ. सी. डी. देशमुख यांच्या पुण्यभूमीत भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय नेहरू युवा केंद्र, रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्यासाठी रोह्यातील विविध प्रतिष्ठान व युवकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा अलिबाग येथे रायगड जिल्हा प्रभाकर …
Read More »आदिवासी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण
बँक ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्राचे वितरण कर्जत ः बातमीदार आदिवासी समाजातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी ठाकूर कातकरी संघटना पुढे सरसावली आहे. त्या अनुषंगाने बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आठ दिवसांचे रोजगार निर्मितीची माहिती देणारे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आठ दिवस 100 टक्के उपस्थिती लावणार्या 71 आदिवासी महिलांना प्रमाणपत्र …
Read More »संधीसाधू पुढार्यांचा मोर्चा
सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेणे शेतकर्यांना शक्य झाले, तो प्रजासत्ताक शाबूत असल्याचा पुरावाच मानला पाहिजे. प्रजेच्या आवाजाला सरकारदरबारी वजन आणि मान आहे हेच यातून सिद्ध होत नाही काय? ऊठसूठ लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची आरडाओरड करणार्या विरोधीपक्षांनी या निमित्ताने थोडे आत्मचिंतन करावे. अवघ्या विश्वाला अभिमान वाटेल अशा प्रजासत्ताकात रूपांतर झालेल्या …
Read More »स्वतंत्र जनगणनेसाठी ओबीसी एकवटले
जालना : ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी (दि. 24) जालन्यात ओबीसी प्रवर्गातील सर्व घटक एकवटले होते. या मोर्चात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार भागवत कराड, विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, आमदार नारायण कुचे, राजेश राठोड आदी सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला. मोर्चात सुमारे …
Read More »माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालय होणार स्थापन
अलिबाग : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याकरिता नुकतीच तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या व सर्वसामान्य पक्षकारांच्या मागणीला न्याय मिळाला आहे. महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, रोहा व पाली या तालुक्यांकरिता जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना सन 2008मध्ये …
Read More »प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज; संत परंपरेचे घडणार दर्शन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या वतीने वारकरी संत परंपरेवर आधारित चित्ररथ या वर्षी प्रजासत्ताक दिनी होणार्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथाची बांधणी पूर्ण झाली असून, चित्ररथासोबत सहभागी होणार्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आठ फुट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण …
Read More »पनवेल : वाजे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने शेकापचा दारुण पराभव करून अनेक वर्षांची मक्तेदारी मोडीत काढली. या ग्रामपंचायतीमधील विजयी शिलेदारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेश भोईर, राजेंद्र भालेकर, भगवान बुवा, राघो पाटील आदी पदाधिकारी व प्रमुख …
Read More »मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर
नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथे होणार्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ही घोषणा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रतिनिधींच्या रविवारी (दि. 24) झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. साहित्य …
Read More »