Breaking News

Monthly Archives: January 2021

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संजय कदम यांना पुरस्कार

पनवेल : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा चषक 2021 सामन्याच्या वेळी कोरोना काळात केलेल्या कामांची दखल घेत  पत्रकार संजय चंद्रकांत कदम यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊ गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर डॉ. गिरीश गुणे, नगरसेवक अनिल भगत, मुकीत …

Read More »

अलिबाग किनारी एटीव्ही राईडसची अरेरावी

पत्रकाराला शिवीगाळ आणि धक्काबुक्की; गुन्हा दाखल अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्रकिनार्‍यावर एटीव्ही राईडसची अरेरावी सुरू आहे. अलिबाग समुद्रकिनार्‍यावर शनिवारी (दि. 30) एटीव्ही राईडसला अपघात झाला. यात दोन महिला जखमी झाल्या. या अपघाताचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला धक्काबुक्की करत तेथील व्यावसायिकांनी त्याच्या हातातील मोबाइल काढून घेतला व शिवीगाळ केली. या …

Read More »

रायगडावर राज्य सरकारचे दुर्लक्ष

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा आरोप नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला काही वर्षानंतर सुनील तटकरे यांच्या रूपाने खासदारपद मिळाले आहे. त्यांची कन्या सध्या राज्य मंत्रिमंडळात सुद्धा आहे. पक्षात आणि राज्य सरकारमध्ये त्यांचे वजन सुद्धा आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात पैसे का येत नाहीत, नेतृत्व कुठे तरी कमी पडत असल्यामुळेच रायगडावर राज्य …

Read More »

पनवेल : शेलघर ग्रामस्थ मंडळ व महेश स्पोर्ट्स यांच्या वतीने जावळे येथील मैदानात आयोजित सरपंच चषक 2021 स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे कौतुक केले. या वेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य विजय …

Read More »

टोकियो ऑलिम्पिक होणारच जपानच्या पंतप्रधानांचा दावा

टोकियो : वृत्तसंस्था जपानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत अनिश्चितता वाढू लागली आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिक होणारच, असा दावा जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी केला आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत दूरचित्रसंवादाद्वारे ते बोलत होते. ‘भविष्यातील विषाणू संसर्गाची तयारी करण्यासाठी आम्हाला धडा मिळाला आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा …

Read More »

इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी ठरू शकतात धोकादायक!

चेन्नई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीमध्ये 2-1ने कसोटी मालिकेत हरविणार्‍या टीम इंडियापुढे आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020मध्ये कोरोनामुळे फार क्रिकेट खेळले गेले नाही, पण इंग्लंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी …

Read More »

कर्नाळा पक्षी अभयारण्याची पर्यटकांना साद

पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. शासनाने कर्नाळा किल्ल्याच्या परिसरातील 4.48 चौरस किलोमीटर क्षेत्र 1968 मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. 50 वर्षांमध्ये येथील वनसंपदा व पक्ष्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा पक्षी निरीक्षणासाठी योग्य कालावधी समजला जातो, …

Read More »

मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडी

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील मोहोपाडा येथून संकष्टी चतुर्थी निमित्त हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीत श्री गणेश पालखी असल्याने ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिकांनी दर्शन घेतले. या दिंडीत तरुणांची संख्या लक्षणीय होती. संकष्टी चतुर्थीनिमित्त रसायनी परीसरातील वारकरी संप्रदायाने …

Read More »

उरण येथील मोरा कोळीवाडा ते कार्ला पालखी उत्सव

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील मोरा कोळीवाडा येथील साई माऊली मित्र मंडळाच्या वतीने मोरा कोळीवाडा ते कार्ला (एकविरा) पालखी उत्सव नुकताच झाला. मोरा येथील साईबाबा मंदिर येथे सर्व कोळी बांधवांनी देवीची पूजा केली व पालखीला सुरुवात झाली. पुढे कार्ला (एकविरा) येथे पालखी पोहचल्यानंतर आरती करण्यात आली. या सोहळ्यास साई माऊली …

Read More »

पनवेल येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात होत आहेत. रस्ता सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत, 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमामध्ये शुक्रवारी (दि. 29) पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे …

Read More »