पनवेल : वार्ताहरलग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात एका व्यक्तीने शेजारी राहणार्या माय-लेकीची धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 19) पनवेल तालुक्यातील दापोली येथे घडली. यामध्ये मुलीचे वडीलसुद्धा जखमी झाले आहेत.पनवेल तालुक्यातील दापोली येथील अरुण डाऊर यांच्या चाळीत बळखंडे कुटुंबीय राहते. त्यांच्याच बाजूला आरोपी राहतो व तो …
Read More »Monthly Archives: February 2021
सुधागडात मुसळधार पाऊस
गारपिटीचा बागायतदारांना फटका; वीटभट्टी व्यवसायही कोलमडला पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात गुरुवारी (दि. 18) सायंकाळी सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारपिटीने विविध भागाला झोडपून काढले. या वेळी वीज गायब झाली होती. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. सध्या सुधागड तालुक्यात वाल, मूग, हरभरा आदी कडधान्ये …
Read More »वळके येथील जनसुनावणी रद्द
शेतकर्यांचा विरोध, रास्ता रोको; वाघुलवाडी ते तळेखार प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रेवदंडा : प्रतिनिधी शेतकरी व मच्छीमार संघर्ष समितीने प्रस्तावित वाघुलवाडी ते तळेखार एमआयडीसी प्रकल्पाच्या वळके येथील जनसुनावणीस गुरुवारी (दि. 18) जोरदार विरोध दर्शविला. शासनाच्या वतीने जनसुनावणी रद्द केल्याचे सांगण्यात आले, मात्र तसे लेखी पत्र देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष …
Read More »कामगार संघटनेच्या विस्तारित कार्यालयाचे रविवारी उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.या सोहळ्यास उदघाटक म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, आमदार महेंद्र थोरवे, …
Read More »राज्यात कोरोनाचा नवीन स्टेन नाही
आरोग्य विभागाचा निर्वाळा पुणे : प्रतिनिधीराज्यात सध्या आढळून येणारा कोरोना विषाणू हा नवीन प्रकार (स्टेन) नाही. आतापर्यंत आढळत असलेलाच हा विषाणू आहे, असा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे, तसेच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने आरोग्य विभागाची झोप …
Read More »हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीअहमदनगर जिल्ह्यातील नेवासामधील सोनई येथील शेतकर्यांनी मुळा सहकारी साखर कारखान्यावर व शिवेसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप करीत आपल्या शेतामधील उभा ऊस पेटवून दिला आहे. गडाख यांच्या ताब्यातील साखर कारखाना या शेतकर्यांच्या ऊसाला तोड देत नाही. त्यांची नोंद घेतली गेलेली नाही, कारण ते विरोधक आहेत. त्यांनी गडाख यांच्याविरोधात …
Read More »पनवेल महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल : प्रतिनिधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आणि टपाल नाका येथील अर्धाकृती पुतळ्यास भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून …
Read More »‘अवकाळी’चा बळीराजाला फटका
पीक, फळबागांचे नुकसान, भरपाईची मागणी मुंबई : प्रतिनिधीहवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात आला आहे. राज्य शासनाने या संकटात मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी …
Read More »गुड न्यूज! कोव्हिशिल्डपाठोपाठ कोव्हॅक्सिन रायगडात दाखल
अलिबाग : प्रतिनिधीसीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लशीपाठोपाठ भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिल्ह्यात सध्या 19 केंद्रांवर प्रत्यक्ष लसीकरण सुरू असून, लसीकरणासाठी नोंदणी केलेल्यांपैकी 50 टक्क्यांहून कमी लोकांनी लसीकरण केले आहे, तर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणाचे प्रमाण 65 टक्के एवढे आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 25 …
Read More »पनवेलमध्ये भिकारीमुक्त अभियान
पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहरात भिकार्यांची संख्या वाढत चालली होती. यातूनच छोट्या-मोठ्या चोर्यामार्या वाढल्या होत्या. या दृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी भिकारीमुक्त अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी असणार्या भिकार्यांविरूद्ध आता धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठ, एसटी स्टँड, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper