Breaking News

Monthly Archives: February 2021

पोलिसांना मास्कचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचया प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत यांच्यातर्फे कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी बजावत असलेल्या कोविड योद्धा पोलिसांना खांदेश्वर पोलीस ठाण्यात मास्कचे वाटप करण्यात आले. हे मास्क खासकरुन पोलिसांसाठी बनविण्यात आलेले असून त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगोही प्रिंट करण्यात आला आहे. मास्क देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक …

Read More »

उरणमध्ये कोरोना रोखण्यासाठी जनजागृती मास्क आणि पत्रकाचे वाटप

उरण : वार्ताहर येथील उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन व नवपरिवर्तन संस्था यांच्या वतीने नागरिकांना मास्क आणि कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भातील पत्रकाचे वाटप शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. उरणमधील पालवी हॉस्पिटल चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला असून जनजागृतीही करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याविषयी कोणती काळजी घ्यावी ह्या …

Read More »

पनवेल मनपा अधिकार्यांकडून जम्बो फॅसिलिटी सेंटरची पाहणी

पनवेल : प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची तयारी महानगरपालिका करत आहे. कळंबोली येथील सिडकोच्या जम्बो फॅसिलीटी सेंटरची मनपा अधिकार्‍यांनी नुकतीच पाहणी केली. तेथील सोयी सुविधा पाहून ज्या सुविधांची कमतरता आहे त्यांची तातडीने पुर्तता करण्याच्या सुचना पाहणीदरम्यान मनपा अधिकार्‍यांनी सिडकोकडे केली. कळंबोली येथील …

Read More »

नवी मुंबईत भाजपचे चक्का जाम आंदोलन

मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासह त्वरित अटक करण्याची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणात  ठाकरे सरकारमधील वन मंत्री संजय राठोड हे दोषी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांना त्वरित अटक करा, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या या मागणीसाठी आमदार श्वेता महाले, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सायन-पनवेल …

Read More »

विराट कोहलीकडून अश्विनची स्तुती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थातिसर्‍या कसोटीत भरताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्‍याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने 112, तर भारताने 145 धावा केल्या. दुसर्‍या डावात इंग्लंडचा डाव 81 धावांत आटोपून भारताला 49 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (25*) …

Read More »

गोलंदाज विनय कुमारची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय संघाचा वेगवान गोलंदाज विनय कुमार याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार्‍या विनय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.विनय कुमारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिलेली नसली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचे नाव आदराने घेतले जाते. विनय कुमारच्या नेतृत्वात कर्नाटकच्या संघाने रणजी करंडकदेखील …

Read More »

पॉइंट टेबलमध्ये भारत अव्वल स्थानी

अहमदाबाद ः वृत्तसंस्थामोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशीच भारताने इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणतीही विकेट न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केले. या विजयासह टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट …

Read More »

हिमा दासची कमाल

18 महिन्यांनंतर ट्रॅकवर उतरून जिंकले सुवर्ण नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताची स्टार धावपटू हिमा दास ही जवळपास दीड वर्षानंतर ट्रॅकवर उतरली आणि तिने पहिल्याच स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. इंडियन ग्राप्री 2च्या महिला गटात तिने हे यश मिळवले. द्युती चंद हिनेही 100 मीटर शर्यतीत 11.44 सेकंदांची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. …

Read More »

वनमंत्री संजय राठोड ठरले कोरोनाचे सुपर स्प्रेडर?

शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 19 जण बाधित वाशिम ः प्रतिनिधीपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनाचे परिणाम आता दिसू लागलेत. राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास यांच्यासह गावातील 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनाच्या काही दिवसांनंतर लगेच गावातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने …

Read More »

शेकापचे माजी उपसरपंच काशिनाथ गोंधळी भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्तशेकापचे खेरणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच काशिनाथ नामा गोंधळी यांनी शुक्रवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. काशिनाथ नामा गोंधळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखीन वाढणार …

Read More »