Breaking News

Monthly Archives: February 2021

देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा -चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत, हे सर्व जर राहुल गांधींच्या समंतीने घडले असेल तर यापेक्षा लज्जास्पद देशासाठी अधिक काही असू शकत नाही. देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा झाली आहे. असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर केला आहे. शेतकरी …

Read More »

पुण्यातील कार्यक्रमात मराठी भाषा मंत्र्यांचे इंग्रजीत भाषण

पुणे : प्रतिनिधीसिम्बायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात निम्म्यापेक्षा अधिक व्यक्तींना मराठी भाषा समजत असतानाही, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी भाषण इंग्रजीत केल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.एकीकडे राज्यपाल, मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात उपस्थितांना मराठी बोलण्याचा आग्रह धरतात, तर दुसरीकडे मराठी भाषा विभागाचे मंत्री इंग्रजीत भाषण करतात अशी कुजबुज …

Read More »

फणसाड अभयारण्यात पक्ष्यांच्या 190 प्रजातींची नोंद

मुरूड : प्रतिनिधीमुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात प्राण्यांबरोबरच पक्ष्यांचीही संख्या वाढत असून, नुकत्याच केलेल्या गणनेत पक्ष्यांच्या 190 प्रजाती या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत.सन 1986मध्ये अधिसूचित करण्यात आलेले मुरूडमधील फणसाड अभयारण्य 54 चौकिमी क्षेत्रफळात पसरलेले असून, मुरूडच्या नबाबाचे हे शिकारीसाठीचे राखीव जंगल असल्याने अन्य मानवी हस्तक्षेपापासून ते आजही सुरक्षित राहिले आहे. वन …

Read More »

प्रेमसंबंधाच्या रागातून बापाने केली मुलीची हत्या

खालापूर तालुक्यात खळबळ खोपोली, खालापूर : प्रतिनिधीबिहार राज्यातून आलेल्या कुटूंबातील 14 वर्षीय मुलीचा बापाने खून करून धड आणि शीर नदीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार खालापूर हद्दीत घडला. या घटनेनंतर क्रूरकर्मा बाप फरारी झाला आहे.खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय सुदर्शन सिंह (वय 50, रा. कुद्रा, जि. कैमुर भबुआ, बिहार)हा त्याची पत्नी आणि …

Read More »

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर मविआ सरकारमध्ये नाराजीनाट्य

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज; राऊतांचा दुजोरा मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नाना पटोले यांच्या हाती दिल्याने विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.काँग्रेसने विधानसभेचे अध्यक्षपद असलेल्या पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याने मुख्यमंत्री …

Read More »

पवारांकडे अदानी येऊन गेल्यानंतर वीज बिलमाफीचा निर्णय मागे

राज ठाकरेंचा गौप्यस्फोट ठाणे : प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीज बिल दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारमधील मंत्री आधी वीज बिल माफ करू म्हटले, पण गौतम अदानी हे शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतेही वीज बिल …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री शाह रविवारी सिंधुदुर्गमध्ये

कुडाळ : प्रतिनिधीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (दि. 7) कोकणात येणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी शाह येणार आहेत. दुपारी 2 वाजता हा सोहळा होणार आहे.कुडाळ तालुक्यातील पडवे गावात 70 एकर खासगी जमिनीवर नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेज उभारले आहे. …

Read More »

कोरोना नियंत्रणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्थाभारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) भारताचे कौतुक केले आहे. भारताने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यात चांगली कामगिरी केल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस ए. घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे.या संदर्भात बोलताना ट्रेडोस म्हणाले, भारताने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक अपघातात एक ठार

खोपोली : प्रतिनिधी चालकाचे नियंत्रण सुटल्याने शनिवारी (दि. 6) सकाळी मुंबईकडे चाललेला ट्रक बोरघाटातील सीआरआयएल कंपनीजवळ नाल्यात कोसळला. या अपघातात वाहनचालक ट्रकखाली चिरडून ठार झाला,  तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात सीआरआयएल कंपनीजवळ शनिवारी सकाळी 8.45वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबईकडे चाललेला ट्रक महामार्गाजवळच्या नाल्यात कोसळला. …

Read More »

शेतांमध्ये कडधान्य पीक तयार

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे-निडीचा प्रसिद्ध म्हणून ओळख असलेल्या वाल, पावटा या कडधान्यांची पिके काहीअंशी उशिरानेच तयार झाली असल्याने शहरातील खवय्यांमध्ये पोपटीच्या सिझनला सुरुवात झाली आहे. डिसेंबरदरम्यान अचानक पाऊस पडल्याने या भागात लावलेल्या वाल, पावटा या कडधान्यांच्या पिकाला धोका पोहोचला होता. लावलेली पिके काही ठिकाणी नष्ट झाल्याने काही शेतकर्‍यांना या पिकांची …

Read More »