Breaking News

Monthly Archives: February 2021

रूटचे द्विशतक; इंग्लंडचा धावांचा डोंगर

चेन्नई : वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने दुसर्‍या दिवसअखेर 8 बाद 555 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. दिवसातील पहिल्या दोन सत्रांवर इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व राखल्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसे यश मिळाले, पण …

Read More »

युगपरिवर्तक नाटक लोक-शास्त्र सावित्री

पनवेल : रामप्रहर वृत्त थिएटर ऑफ रेलेवन्सचे शुभचिंतक आणि अभ्यासक माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी, न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प करून, सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे युगपरिवर्तक नाटक लोक-शास्त्र सावित्री रविवारी (दि. 21) सकाळी 11.30 वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रस्तुत होणार आहे. या …

Read More »

गरीब-गरजू लहान मुलांसाठी मिसळ महोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा उपक्रम; सभागृह नेते परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून 2021 रोजी 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने  महाराष्ट्र सहचिटणीस व …

Read More »

तोतया टीसीकडून तरुणाची लूट

पनवेल : वार्ताहर अकोला येथून मुंबईत कामानिमित्त आलेल्या तरुणाला टीसी असल्याचे भासवून त्याच्याकडील मोबाइल फोन आणि रोख रक्कम लुबाडून नेल्याची घटना हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते बेलापूर दरम्यान घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत बनावट टीसीने लुबाडलेल्या तरुणाचे नाव हर्षल ज्ञानशिल खंडेराव (वय 19) …

Read More »

‘त्या’ मोबाइल टॉवरच्या उभारणीला पालिकेची स्थगिती

भाजप नगरसेवक आणि रहिवाशांच्या विरोधानंतर कामकाज थांबले पनवेल : वार्ताहर कामोठे सेक्टर 36 आणि सेक्टर 7 मधील शुभागण कॉम्प्लेक्सच्या समोरील डिव्हाइडरवर उभारण्यात येत असलेल्या मोबाइल टॉवरच्या बांधकामाला पनवेल महानगरपालिकेने स्थगिती दिली आहे. स्थानिक नगरसेवक विजय चिपळेकर आणि रहिवाशी यांच्या विरोधानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या …

Read More »

जनतेने दिलेला झटका

वाढीव वीज बिलांमध्ये सवलत मिळेल अशा प्रकारची तोंडदेखली मोघम विधाने करण्यात ऊर्जामंत्र्यांनी प्रारंभी वेळ काढला. अखेर वाढीव वीज बिले न भरल्यास कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देण्यापर्यंत सरकारची मजल गेली. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी खरोखरच वीज तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सारेच संतापजनक आहे. कोरोना विषाणूने घातलेले थैमान आता हळूहळू शमत …

Read More »

भाजप महिला मोर्चाचा हळदी-कुंकू समारंभ

नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र कामोठे : रामप्रहर वृत्तभाजप महिला मोर्चा कामोठेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. 4) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील आणि पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या वेळी कामोठे येथील नवनियुक्त महिला पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.या समारंभास कामोठे पोलीस ठाण्याच्या …

Read More »

जेएनपीटीच्या मालवाहतूकीमध्ये 9.14 टक्क्यांची वाढ

उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जानेवारी महिन्यात जेएनपीटीमध्ये 465,084 टीईयूची (वीस फूट समकक्ष युनिट्स) मालवाहतूक करण्यात आली. जी मागील वर्षी याच महिन्यात केलेल्या हाताळणीच्या तुलनेत 9.14 टक्के अधिक आहे. नवीन वर्षाची सुरूवात व लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा …

Read More »

सिडकोतर्फे सामाजिक व धार्मिक वापराच्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकांस मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे शैक्षणिक, वैद्यकीय, संस्थात्मक, धर्मादाय किंवा शासकीय आणि धार्मिक वापराकरिता वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या निर्णयास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईच्या सामान्य विकास नियंत्रण नियमावलीतील (जीडीसीआर) अधिनियम क्र. 16.3(1अ)क मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सिडकोतर्फे …

Read More »

भाजपचे टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन

खारघर-तळोजा मंडलकडून महावितरणचा निषेध पनवेल : रामप्रहर वृत्त महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे दुष्कृत्य केलेले आहे. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलाकडून महावितरणविरोधात टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन व निषेध करण्यात आला. या वेळी मंडलमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते …

Read More »