खारघर, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेलमध्ये जम्बो कोविड केअर उभारण्याच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. शासकीय मान्यतेनंतर कळंबोली येथील भारतीय कपास निगमचे गोदाम अधिग्रहण करण्यास मंजुरी दिल्यानंतर महसुल विभागाने हे गोदाम ताब्यात घेतले आहे. पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जम्बो कोविड केअरची मागणी पुढे आली. रुग्णांना ऑक्सिजन आणि …
Read More »Monthly Archives: April 2021
भाजयुमोतर्फे कोरोना सहाय्यता हेल्पलाइन
मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल : वार्ताहर वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने कोरोना काळात गरजू नागरिकांना मदत करता यावी यासाठी हेल्पलाइनची सुविधा तयार केली आहे. ही सुविधा राज्यपातळीवर काम करणारी आहे. नुकताच 02067326090 या राज्यव्यापी हेल्पलाइनचा शुभारंभ भाजयुमोच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकट काळात …
Read More »भारताच्या सात महिला बॉक्सरना सुवर्णपदक
वार्सा ः वृत्तसंस्था पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडू गितिका, अरुंधती चौधरी, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, सानामचा चानू, विन्का आणि अल्फिया पठाण या सात जणींनी सुवर्णपदकावर नाव कोरले. सात सुवर्णांसह भारताने 2017च्या हंगामातील कामगिरीला मागे टाकले. त्या वेळी भारतीय महिलांनी तीन सुवर्णपदक मिळवले होते. महिलांच्या 48 किलो …
Read More »इटलीतील फुटबॉल क्लब्जना महासंघाचे अभय
रोम ः वृत्तसंस्था युरोपियन फुटबॉलमध्ये बंडखोरी करून सुपर लीगच्या आयोजनाचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. इटलीतील फुटबॉल क्लब्जनी माघार घेण्यापूर्वी सुरुवातीला या स्पर्धेच्या आयोजनाला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता होती, मात्र इटालियन फुटबॉल महासंघाने त्यांना कोणतीही शिक्षा सुनावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लिव्हरपूल, अॅटलेटिको माद्रिद, आर्सेनल, …
Read More »रनमशीन कोहलीचा ‘विराट’ विक्रम
आयपीएलमध्ये सहा हजारधावांचा टप्पा पार मुंबई ः प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयपीएलमध्ये सहा हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने 196 सामन्यांत हा विक्रम प्रस्थापित केला असून, यात पाच शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान …
Read More »ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा
अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारला वगळले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आगामी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेसाठी अनुभवी सुशील कुमारला वगळण्यात आले आहे. याचप्रमाणे माजी आशियाई विजेत्या अमित धानकरला (74 किलो) राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या संदीप मानपेक्षा प्राधान्य दिले आहे. सोफिया (बल्गेरिया) येथे 6 ते 9 मे या कालावधीत होणारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता …
Read More »‘आरसीबी’चा विजयी चौकार
देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी; राजस्थान पराभूत मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)ची विजयी घोडदौड सुरुच असून, राजस्थानविरुद्धचा सामना जिंकत बंगळुरूने एकही गडी न गमावता आरामात जिंकला आणि विजयी चौकार मारला. राजस्थानने विजयासाठी दिलेले 178 धावांचे लक्ष्य बंगळुरूने कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीर जोडीने 16.3 …
Read More »भाजपचे एकनाथ भोपी यांचे निधन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष, सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एमएमआरडीएचे माजी संचालक एकनाथ भोपी यांचे कोरोनामुळे गुरुवारी (दि. 22) वाशी येथील पीकेसी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. एकनाथ भोपी यांच्या अंत्यविधीला भाजप …
Read More »धीर सोडू नका
एक वर्षाच्या कोरोनाविरोधी लढाईचा अनुभव आणि या घातक विषाणूला नेस्तनाबूत करणार्या प्रतिबंधक लसी यांच्या जोरावर ही दुसरी लाट आपल्याला नक्कीच परतवून लावता येईल. त्यासाठी दोन पथ्ये मात्र आवर्जून पाळावी लागतील. कोरोनासारख्या घातक विषाणूशी मुकाबला एकजुटीनेच करता येईल हे प्रथमत: लक्षात घ्यायला हवे. राजकारणाच्या नावाखाली एकमेकांची उणीदुणी काढण्याची ही वेळ नव्हे. …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला मिळणार अधिक ऑक्सिजन
मुंबई ः प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून 97 मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत विशाखापट्टणम येथून पुरवठा सुरू होईल. यामुळे विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे.अनेक रुग्णालयांत प्राणवायूची कमतरता आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्राणवायूची निर्मिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper