Breaking News

Monthly Archives: April 2021

पनवेल महापालिकेचा एमजीएम रुग्णालयासोबत करार

200 आयसीयू बेड मिळणार; दररोज 300 कोरोना टेस्टही होणार पनवेल ः प्रतिनिधीकामोठे एमजीएम रुग्णालय आणि पनवेल महानगरपालिका यांच्यात कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त मोफत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने 200 आयसीयू बेड आणि दररोज 300 आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचा करार गुरुवारी (दि. 22) करण्यात आला. सध्या एमजीएम रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन …

Read More »

कोरोनामुळे घाबरू नका आणि निष्काळजीपणाही करू नका!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे वेगळी आणि गंभीर आहे, मात्र घाबरू नका आणि निष्काळजीपणाही करू नका, असे आवाहन  भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेला व शासनाला केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, आरोग्य व्यवस्था, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होणारा त्रास, …

Read More »

राज्यात नवे निर्बंध लागू

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात गुरुवारी (दि. 22) रात्री 8 वाजल्यापासून कठोर निर्बंध लागू झाले आहेत. यामध्ये कार्यालयातील उपस्थिती, लोकल प्रवास, लग्न समारंभ ते अत्यावश्यक सेवेसंदर्भातील अनेक नियमांचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील, असेही …

Read More »

शांतिनिकेतन शाळेतील फी काऊंटर बंद करा; पालकांची मागणी

पनवेल : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्याच्या कारणावरून नवीन पनवेल येथील शांतिनिकेतन शाळेतील फी काउंटर बंद करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 25 ते 30 पालक शाळेच्या गेटसमोर जमले होते. त्यांनी मुख्याध्यापकांसमोर ही मागणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने शाळा बंद आहेत. त्यामुळे बर्‍याच शाळांनी ऑनलाइन …

Read More »

उरणमध्ये हळद लागलेल्या वधूने केले रक्तदान; समाजाला दिला एक वेगळा संदेश

उरण : प्रतिनिधी कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत समर्पण ब्लड बँक-घाटकोपर मुंबई यांच्या सहाय्याने सलग दुसर्‍या वर्षीही रामनवमीचे औचित्य साधून कळंबुसरे येथील साई मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात होते.शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे साई वेताळ ग्रुपची सदस्य आरती पाटील हिने स्वतःच्या लग्नाच्या हळदीच्या दिवशी रक्तदान करून समाजाला एक …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीकडून लवकरच जम्बो कोविड केअर सेंटर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पेणजवळील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली होती. त्या अनुषंगाने जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे रहात आहे. तब्बल 800 बेडचे हे अद्यावत कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात …

Read More »

वीकेण्ड लॉकडाऊनचे उल्लंघन दोन लाख 10 हजारांचा दंड वसूल

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2मध्ये पोलीस प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दोन लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासन आणि शासनातर्फे करण्यात येत आहे, …

Read More »

समस्या सोडविण्यासाठी संपर्क करा -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करीत असणारे कार्यक्षम माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यास नेहमीच तत्पर असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रक्त तसेच प्लाझ्मा आवश्यक गोष्ट असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व इतर संपर्कातून गरजवंतांना त्वरित मदत करीत आहेत. त्यासाठी त्यांनी …

Read More »

उरण शहरात कडक पोलीस बंदोबस्त

उरण : वार्ताहर राज्यात गुरुवार (दि. 22) पासून नवीन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमावली नुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, दुध विक्रीची …

Read More »

औद्योगिक क्षेत्रातील शेकडो कामगार बेरोजगार; पनवेल परिसरातील कामे ठप्प

पनवेल : वार्ताहर सद्य स्थितीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत चालले आहे. रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी हॉस्पिटलला लागणार्‍या ऑक्सिजन व्यतिरिक्त औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा शासनाने बंद केल्यामुळे पनवेल आणि परिसरातील कटिंग आणि फेब्रिकेशन उद्योग पूर्णतः ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या व्यवसाय मध्ये काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार झाले …

Read More »