Breaking News

Monthly Archives: May 2021

…अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करू!

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचा गर्भित इशारा   पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील साहेबांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले पाहिजे; अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करण्याचा गर्भित इशारा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने …

Read More »

देशात ‘स्पुटनिक व्ही’ची ऑगस्टपासून निर्मिती

नवी दिल्ली : भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश झाला आहे. नागरिक लवकरच ही लस दिली जाणार आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून देशात ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन सुरू होणार आहे, अशी माहिती  रशियामधील भारताचे राजदूत डीबी व्यंकटेश वर्मा यांनी दिली. ते म्हणाले, मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुटनिक व्हीच्या …

Read More »

पाताळगंगेच्या पाण्यावर जलपर्णीचे जाळे

मोहोपाडा : प्रतिनिधी पाताळगंगा नदी किनार्‍यावरील श्री गजानन महाराज मंदिराजवळील नदिपात्रात दोन एकरपेक्षा जास्त जलपर्णीचे जाळे पसरले आहे. यामुळे पाताळगंगा नदीवर मासेमारी करून जीवन जगणार्‍या आदिवासी व भोई बांधवात नाराजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीतील पाण्यावर जलपर्णीचे रान माजल्याने जणूकाही खेळाचे मैदान असल्याचे वाटू लागले आहे.पाण्यावर असलेली ही …

Read More »

इंटरनेटच्या युगात हरवले मामाचे गाव

नवी मुंबई : प्रतिनिधी झुक झुक आगीन गाडी, पळती गाडी पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या! या बालगीताचा विसर आता पडला आहे. काळाच्या ओघात आणि इंटरनेटच्या जमान्यात मामाचे गाव हरवले आहे.  शाळेला उन्हाळ्याची सुटी लागताच बच्चे कंपनी मनात बेत रचायची, ते मामाच्या गावाला जाऊन धम्माल करण्याची, मौज, मजा, मस्ती, खेळ …

Read More »

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त कोकण भवनात शपथ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने उप आयुक्त(सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी शुक्रवारी (दि. 21) कोकण भवनातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्‍यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कोकण भवनातील  पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहामध्ये कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी …

Read More »

‘म्युकरमायकोसिस’साठी तुटपूंजी मदत

राज्य शासनाकडून केवळ दीड लाखांची योजना खारघर : प्रतिनिधी म्युकरमायकोसिस या कोरोनानंतर उद्भवणार्‍या बुरशीजन्य आजाराच्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन केला जाईल, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र या योजनेची मर्यादा दीड लाख असुन या आजारावरील खर्च किमान आठ लाखांपर्यंत असल्याने त्यामुळे या आजाराने बाधीत झालेल्या …

Read More »

जीपी पारसिक सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त जीपी पारसिक सहकारी बँक 50व्या वर्षांत (सुवर्ण महोत्सवी वर्षात) पदार्पण करत असताना ग्राहकांसाठी बँकेने सुवर्णसंधी दिली आहे. भारतात सर्वांत कमी गृहकर्ज व्याजदर 6.65 टक्के करण्यात आले आहे, तसेच वाहन कर्ज 7.75 टक्के सोने तारण कर्ज 8.25 टक्के करण्यात आले आहेत, असे बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील, उपाध्यक्ष …

Read More »

सिडकोच्या घरांचा ताबा 1 जुलैपासून मिळणार

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील अर्जदारांना 1 जुलै 2021पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. नगर नियोजन व विकास क्षेत्रातील देशातील एक अग्रणी प्राधिकरण असणार्‍या सिडको महामंडळाने बांधकाम क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण …

Read More »

उरणमधील शिक्षिकांकडून पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला गुरुवारी (दि. 20) उरण तालुक्यातील शिक्षिकांनी एक हात मदतीचा म्हणून वैद्यकीय साहित्यांची मदत केली आहे. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला भेडसावून सोडलेले आहे. या महामारीत अनेक जीवलगांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. उरण तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते खोपटे-कोप्रोली रस्त्याचे भूमिपूजन

उरण ः वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (एनएचआयए)कडून मंजूर झालेल्या कोप्रोली-खोपटे-चिरनेर रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील खोपटे-कोप्रोली रस्त्याचे काम करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) झाले. या कार्यक्रमास भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष …

Read More »