Breaking News

Monthly Archives: July 2021

माथेरान म्हणजे नैसर्गिक ऑक्सिजन केंद्र -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदारघनदाट जंगलामुळे माथेरान हे ऑक्सिजनचा खजाना असलेले केंद्र असून येथे आल्यावर मन प्रसन्न होते, असे प्रतिपादन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.जिल्हाधिकारी निधी चौधरी या परिवारासोबत माथेरानला पर्यटनासाठी आल्या आहेत. खाजगी दौरा असूनही त्यांनी येथील बी. जे. हॉस्पिटलमधील कोविड वार्ड, ओपीडी, ऑक्सिजन यंत्रणा यांची पहाणी केली. तसेच तेथील …

Read More »

चाईल्ड लाइन,‘जाण‘कडून पूर्वाला आधार

खालापूर : प्रतिनिधी वडील गमावलेल्या आणि आई मानसिक रुग्ण असलेल्या खोपोलीतील आठ वर्षांच्या पूर्वा राहुल देवकुळे या मुलीच्या पुनर्वसनाची जबाबदारी रायगड चाईल्ड लाइन या संस्थेने घेतली आहे. तर पनवेलच्या जाण फाऊंडेशनने तिच्या संगोपन, शिक्षणाची  जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे पूर्वाच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा मिळाली आहे.पूर्वा राहुल देवकुळे या अवघ्या आठ वर्षाच्या …

Read More »

दिलासा! पनवेलमध्ये पॉझिटिव्हीटी दरात घट; कोरोना चाचण्या वाढविल्याचा परिणाम, चार दिवसांत 22 हजारांहून अधिक टेस्ट

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याप्रमाणेच पनवेल कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रात दररोज सरासरी 4000 आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम हळूहळू दिसू …

Read More »

पुरामुळे नांदगाव हायस्कूलचे नुकसान

मुरुड : प्रतिनिधीतालुक्यातील यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या कार्यालयासह प्रत्येक वर्गात पुराचे पाणी शिरल्यामुळे शाळेतील  वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मुरूड तालुक्यात सोमवारी 348 मिलीमीटर त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी 204 मिलीमीटर पाऊस पडल्याने नदी व समुद्राशेजारी असणार्‍या सर्व गावांत पुराचे पाणी शिरले. नांदगाव हायस्कूलमध्ये तर प्रत्येक वर्गात …

Read More »

म्हसळा कधी होणार आरोग्यसंपन्न?; ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नाही, तर तालुक्याला नाही तालुका आरोग्य अधिकारी

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोविड-19चे रुग्ण वाढत आहेत, मात्र ग्रामीण रुग्णालयात स्थापनेपासून वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या  अधीक्षकांचा कारभार श्रीवर्धनमधून केला जात आहे, तर तालुका आरोग्य अधिकार्‍याचा कारभार जि. प. दवाखाना पाभरे येथील वैद्यकीय अधिकारी पहातात. तालुक्यातीत नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी ही दोन्ही …

Read More »

सिडकोकडून मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी ऐरोलीतील भूखंडाचे शासनाकडे हस्तांतरण

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीकरिता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाला देण्यात आलेल्या नवी मुंबईतील ऐरोली येथील भूखंडाचे मंगळवारी (दि. 13) मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अधिकार्‍यांतर्फे हस्तांतरण करण्यात आले. …

Read More »

‘रुनाया’तर्फे लसीकरण मोहीम; नवेदर नवगावातील 500 नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस

अलिबाग ः रामप्रहर वृत्त भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्‍या मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट अप्सपैकी एक असलेल्या रुनाया समूहाने कोविडच्या संकटावर मात करण्यात सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होत अलिबाग तालुक्यातील नवेदार नवगाव गावात लसीकरण मोहीम राबविली. यामध्ये तब्बल 500 नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आला. रायगड जिल्ह्यात विशेषत: अलिबाग भागात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड …

Read More »

पॉस्को कंपनीचा मूठभर पुढार्‍यांना फायदा; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे-भागाड परिसरात आलेल्या पॉस्को कंपनीचा फायदा स्थानिकांना नव्हे; तर येथील मूठभर पुढार्‍यांना, त्यांच्या मुलांना तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि. 13) माणगाव येथे बोलताना केला. विळे-भागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांवर झालेल्या अन्यायाबाबत भागाड सरपंच प्रकाश …

Read More »

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा गौरवशाली जीवनपट वेबेक्सवर

खारघर ः रामप्रहर वृत्त भारतीय जनसंघाचे संस्थापक तसेच भाजप कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन 23 जून आणि जन्मदिन 6 जुलै या पंधरवड्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ स्तरावर अनेक कार्यक्रम झाले. खारघर तळोजा मंडल अंतर्गत …

Read More »

सीरम इन्स्टिट्यूट करणार ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन

भारतात 30 कोटी डोसचे नियोजन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी …

Read More »