टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये अतानू दासने अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे अटीतटीच्या या सामन्यात अतानूने ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचाही पराभव केला. अतानू दासने आधी चीनी ताइपेच्या डेंग यू-चेंगचा 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. अतानूने हा सामना 27-26, 27-28, 28-26, 27-28 आणि …
Read More »Monthly Archives: July 2021
सिंधू उपांत्यपूर्व फेरीत : पदकापासून केवळ दोन विजय दूर
टोकियो ः वृत्तसंस्था विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत 12व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा 40 मिनिटांमध्ये …
Read More »बॉक्सर सतीश कुमारची उपांत्य फेरीत धडक
टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय बॉक्सर सतीश कुमारने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 16व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1ने पराभूत केले. सतिशच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत. पहिल्या फेरीत सतीशने प्रभावी खेळ करून पंचांची आणि उपस्थितांची मने जिंकली तर दुसर्या फेरीत …
Read More »भारत उपांत्यपूर्व फेरीत; टोकियो ऑलिम्पिकध्ये अर्जेंटिनावर मात
टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनाला साखळी फेरीतील सामन्यात धूळ चारली आहे. भारताने अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 3-1च्या फरकाने जिंकला. या विजयासोबतच भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही …
Read More »विवेक पाटील यांना तळोजा तुरुंगात हलविले
पनवेल ः प्रतिनिधीमुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७ वाजता तळोजा जेलमध्ये हलविण्यात आले.प्रकृतीचे कारण पुढे करीत, ‘ऑर्थर रोड जेलऐवजी माझ्या घरावळील तळोजा जेलमध्ये मला हलवावे,’ अशी मागणी घोटाळेबाज विवेक पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने त्यांना …
Read More »पनवेलमधून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, सीकेटी, आरटीसीसीएस महाविद्यालयांचा पुढकार पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टी व दरड कोसळल्याने महाडवासियांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा अस्मानी संकटसमयी, पूरग्रस्त बांधवांना माणुसकीची हाक देत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय आणि …
Read More »न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा ठाकूर यांची निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा गोपीचंद ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी सरपंच जितेंद्र म्हात्रे, विभागीय अध्यक्ष विजय घरत, जयवंत देशमुख, माजी सरपंच चिंतामण भोईर, माजी उपसरपंच सागर ठाकूर, उलवा उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्य हरेश्वर म्हात्रे, राम मोकल, मीनाक्षी …
Read More »पनवेलच्या सोसायटी मित्र मंडळाकडून महाडमधील पूरग्रस्तांना मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील मिडलक्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत बुधवारी (दि. 28) सकाळी महाडला रवाना करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोसायटी मित्र मंडळाचे कौतुक केले. या वेळी मंडळाचे …
Read More »महाड, पोलादपूरातील दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण
दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार अहवाल अलिबाग : प्रतिनिधी महाड, पोलादपूरात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या यानंतर या सर्व गावांची भुवैज्ञानिकांच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत ते आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहेत. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये, हिरकणीवाडी येथे तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, साखर सुनातरवाडी, …
Read More »महाडमध्ये भाजपचे अखंड सेवाकार्य; नेत्यांकडून पाहणी, मदतवाटपाचाही घेतला आढावा
महाड ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन, तसेच दरड कोसळल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्त व दरडग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी केंद्र व राज्यातील भाजप नेते व लोकप्रतिनिधींनी तत्काळ धाव घेऊन पाहणी केली, तसेच पूरग्रस्तांना मदत देणे सुरू केले. त्यामुळे महाडकरांना मोठा दिलासा मिळाला. भाजप नेत्यांनी बुधवारीही (दि. 28) महाडमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper