Breaking News

Monthly Archives: July 2021

महाड, पोलादपूर तालुक्यातील 188 गावे अद्यापही अंधारात

अलिबाग ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड व पोलदपूर तालुक्यातील 268 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 80 गावांमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे, मात्र अतिवृष्टी होऊन सात दिवस झाले तरी या दोन तालुक्यांतील तब्बल 188  गावांमधील 68 हजार 856 वीजग्राहक आजही अंधारात आहेत. अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर तालुक्यात महावितरणचे अतिउच्च दाबाचे …

Read More »

महाडमध्येे साकारणार एनडीआरएफचा बेसकॅम्प

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण पाहता महाड येथे राष्ट्रीय आपत्ती दलाचे (एनडीआरएफ) बचाव पथक कायमस्वरूपी असणार आहे. यासाठी आवश्यक सुमारे पाच एकर क्षेत्र असलेली शासकीय जागा दुग्धव्यवसाय विभागाने देण्याबाबत सहमती दिली आहे. याबाबत बुधवारी (दि. 28) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत शासन निर्णय …

Read More »

काशीद पूल दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळाली शासकीय आर्थिक मदत

मुरूड : प्रतिनिधी काशीद पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या विजय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश तहसीलदार गमन गावित यांनी प्रदान केला. अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील काशीद येथील छोटा पूल 11 जुलै रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत विजय चव्हाण (रा. एकदरा) यांचा मृत्यू झाला होता. भारतीय जनता पक्षाचे दक्षिण …

Read More »

महाडच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पाली : रामप्रहर वृत्तसेवा महापुराने महाडमध्ये आतोनात नुकसान केले आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईसभाई कादरी यांनी महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अतिवृष्टीमुळे सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांना पूर येऊन, पुराचे पाणी महाड शहर व परिसरातील घरे आणि दुकानांमध्ये घुसले होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर …

Read More »

भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी म्हटले आहे …

Read More »

कर्जतच्या आसल आदिवासीवाडीत घर खचले

कर्जत : बातमीदार अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील आसल आदिवासीवाडीमधील भिमीबाई सांबरी यांचे घर खचले आहे. त्यामुळे त्यांना घरात राहणे धोकादायक झाले असून शासनाने तत्काळ त्या महिलेला मदत देण्याची मागणी होत आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आसल ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आसलवाडीमध्ये भिमीबाई सांबरी यांचे कुडामेडीचे घर आहे. मुसळधार पावसामुळे या महिलेचे घर पूर्ण खचले …

Read More »

गाडली गेली घरे, उद्ध्वस्त झाले संसार!

 महाडमध्ये पुरात तीन, तर दरडीखाली 84 मृत्यू ;  हजारो कोटींचे नुकसान महाड : प्रतिनिधी तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या महाप्रलयात तळीये गाव नकाशावरूनच गायब झाले, तर महाड शहरासह सुमारे 103 गावांना या महापुराचा फटका बसला आहे. यामध्ये हजारो कोटींचे नुकसान झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता …

Read More »

बँक बुडीत निघाल्यास ठेवीदारांना 90 दिवसांत मिळणार पैसे; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गैरव्यवहार आणि आर्थिक अनागोंदीमुळे देशात अनेक बँका गेल्या वर्षात बुडीत निघाल्या. बँका बुडाल्याने किंवा आर्थिक घोटाळे झाल्याने त्या बँकांतील ठेवीदारांच्या ठेवींचे काय? त्यांना पैसे कधी मिळणार? असे प्रश्न सातत्याने उपस्थित होत होते. यावर मार्ग काढत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना 90 …

Read More »

राज्यातील शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात

मुंबई : न्यायालयाचे निर्देश आणि पालकांच्या वाढत्या दबावानंतर शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फीकपातीला राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 15 टक्के फी कपातीचा राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे. सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीत पालकांकडे फीसाठी तगादा …

Read More »

रस्त्यावर कचरा न टाकण्याचे अनोखे आवाहन

नगरसेवक राजू सोनी यांची संकल्पना पनवेल : वार्ताहर रहिवाशांसह दुकानदारांनी त्यांच्या घरातील तसेच दुकानातील साठणारा कचरा उघड्यावर रस्त्यावर फेकू नये व त्यांना शिस्त लागावी या उद्देशाने नगरसेवक राजू सोनी यांनी स्वखर्चाने एक संकल्पना योजली. यामध्ये परिसरात दोन फुलझाडांच्या चांगल्या कुंड्या ठेवून तसेच फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले …

Read More »