Breaking News

Monthly Archives: September 2021

हसन मुश्रीफांनी केला 127 कोटींचा घोटाळा; माजी खासदार किरीट सोमय्या यांची चौकशीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 13) पत्रकार परिषदेत केला. याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने विद्युत पुरवठा सुरळीत

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील मनिष मार्केट ते बापटा वाडा परिसर काही तासांकरिता विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांसह पत्रकार गणेश कोळी यांनी नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून या असुविधेबाबत माहिती दिली. सोनी यांनी तत्परतेने वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या साथीने अथक प्रयत्न करून या भागातील विद्युत पुरवठा …

Read More »

दिलासा! देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णसंख्येत घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सोमवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत 28,591 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,32,36,921वर पोहचली. याचवेळी, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती 3,84,921 इतकी झाली. याच काळात 338 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे, कोरोनामृत्यूंचा एकूण आकडा 4,42,655 वर पोहचला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत …

Read More »

संसद टीव्हीचे उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली : संसद टीव्ही या चॅनेलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) संसद भवनात आयोजित कार्यक्रमात होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दाखवणार्‍या लोकसभा टीव्ही …

Read More »

‘मविआ’कडून ओबीसी समाजाची दिशाभूल

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात नागपूर : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. अशावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर …

Read More »

मोठी जुई-कोप्रोली रस्त्यावर विचित्र अपघात; सहा जण जखमी

उरण : वार्ताहर मोठी जुई बस स्थानकाजवळील प्रवाशी नागरीकांना रिक्षा मध्ये घेण्यासाठी उभ्या असलेल्या आटो रिक्षाला मागून आलेल्या प्रवाशी कारने धडक दिली. या झालेल्या अपघातादरम्यान रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्‍या मोटरसायकल स्वारांनीही प्रवाशी कारला जोरदार धडक दिली. या झालेल्या विचित्र अपघातात मोटरसायकल स्वार गंभीररीत्या जखमी झाला आहे. तसेच इतर पाच जण जखमी …

Read More »

‘रोटरी’तर्फे आदिवासी कुटुंबाना गणेशोत्सवानिमित्त साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त गणपती उत्सव हा आपण अतिशय उत्साहाने साजरा करीत असतो, पण आपल्या समाजातील काही घटक आर्थिक अडचणीमुळे हा सण साजरा करू शकत नाही. रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरच्या वतीने अशाच 37 आदिवासी कुटुंबाना गणेश मूर्ती, पूजेचे सामान व विसर्जनापासून संपूर्ण खर्च करून त्यांना हा सण साजरा करण्यास …

Read More »

उरण नगर परिषदेचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रायगडात अतिवृष्टीचा इशारा उरण : वार्ताहर भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 12 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीमध्ये  अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उरण नगर परिषदेकडून नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप …

Read More »

पनवेलमध्ये लसीकरण केंद्रात वाढ

पनवेल : प्रतिनिधी तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्याकरिता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविड लसीकरणासाठी चार नवीन  केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कळंबोली येथे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि डी. जी. तटकरे न्यू इंग्लीश मिडीयम शाळा तसेच मोठा खांदा येथील जिल्हा परिषद शाळा …

Read More »

रायगडसह राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कोकण, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यांचा विचार करता रायगड, पालघर, …

Read More »