माणगाव : प्रतिनिधी कोमसापच्या माणगाव शाखेच्या अध्यक्षा सायराबानू वजीर चौगुले यांच्या ‘चांदणं शब्दांचं‘ या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकताच प्रसिद्ध कवयित्री फरजाना इकबाल यांच्या हस्ते करण्यात आले. मनातला संवेदनशीलतेचा झरा कायम जिवंत ठेवला तरच आपण सतत लिहू शकतो, असे प्रतिपादन फरजाना इकबाल यांनी या वेळी केले. कोमसाप माणगाव शाखेच्या उपाध्यक्ष श्रद्धा …
Read More »Monthly Archives: October 2021
मुरूडमध्ये सातबारा उतार्याचे घरोघरी वितरण
मुरूड : प्रतिनिधी सातबारा म्हणजे मालकी हक्क दाखवणारा दस्ताऐवज असून त्याचे सर्वांनी व्यवस्थित जतन करावे. त्याचप्रमाणे दरवर्षाला नवीन सातबारा काढून आपल्या मालमत्तेमध्ये इतरांचा समावेश तर झाला नाही ना, याची खातरजमा करावी, असे प्रतिपादन मुरूडचे निवासी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड …
Read More »भाजपचे पेणमध्ये सफाई अभियान
नगरसेवक राजेश म्हात्रे यांचा पुढाकार पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष व पेण शहर मल्याळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून पेण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सफाई अभियान राबविण्यात आले. नगरसेवक राजेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने पेण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राबविण्यात आलेल्या या सफाई अभियानात मल्याळी समाजाचे …
Read More »राजकीय शोकांतिका
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या गावात शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या भयंकर हिंसक प्रकारामुळे देशभरातील राजकारण ढवळून निघाले आहे. या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतो. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी गावात आंदोलनकर्त्या शेतकर्यांच्या अंगावर आशिष मिश्रा या मंत्रिपुत्राने गाडी …
Read More »सातार्यात नियतकालिकाचे प्रकाशन
सातारा : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिवविजय 2020-21 या वार्षिक नियतकालिकाच्या अंकाचे प्रकाशन सोमवारी (दि. 4) ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अॅड. रवींद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी ‘रयत’चे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे …
Read More »ठाकरे सरकारला घरचा आहेर
यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी शिवसैनिक रस्त्यावर यवतमाळ : प्रतिनिधी यवतमाळमधील नेर तालुक्यातील शिवसैनिक पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना राज्य सरकारने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरामुळे राज्यातील ठाकरे सरकारला या शिवसैनिकांकडून एकप्रकारे घरचा आहेरच दिला गेल्याचे बोलले जात आहे. …
Read More »सातारा ः रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने ‘रयत’च्या छत्रपती शिवाजी कॉलेज येथे भवन उभारण्यात येत आहे. या नूतन वास्तूचे काम पूर्णत्वास येत असून या कामाची लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने-देशमुख, …
Read More »पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचार्यांचा कोरोना योद्धा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचार्यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या स्वच्छतादूतांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान होत आहे. त्यानुसार महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र …
Read More »तटकरे कुटुंबीयांच्या भूलथापांनी विचलित होऊ नका -महेंद्र घरत; पं. स. सदस्य बिलाल कुरेशी यांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’
पेण : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहे. यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भूलथापा, विकासकामांची खोटी आश्वासने देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याचा एककलमी कार्यक्रम तटकरे कुटुंबीय राबवित असून अशा भूलथापांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी शेलघर (ता. …
Read More »गांधीनगर मनपा निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय
गांधीनगर ः गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे, तर काँग्रेस व आम आदमी पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपने 44 पैकी 41 जागांवर विजय मिळवत निर्विवादपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्या आणि आपला फक्त एका जागेवरच …
Read More »