अकोला ः प्रतिनिधी अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. यावरून मिटकरी आणि कडू यांच्यात वाद पेटला आहे. गावातील पराभव मिटकरींच्या जिव्हारी लागला आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, सर्वच पक्षांनी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आत्मचिंतन करावे. कुरघोडीचे …
Read More »Monthly Archives: October 2021
तळोजातील दफनभूमी, स्मशानभूमी पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोकडील विविध सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यानुसार सिडकोकडून तळोजा येथील दफनभूमी आणि स्मशानभूमी कामकाज महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहे. महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 6) या स्मशानभूमी आणि दफनभूमींची अधिकार्यांसह पाहणी केली.या पाहणी …
Read More »रायगडातील दोन जलतरणपटूंसह प्रशिक्षकाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
जलतरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष परेश ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त47व्या ज्युनियर व 74व्या सिनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पेणमधील अथर्व लोधी आणि महंत म्हात्रे या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा कर्नाटकमधील बंगळुरू येथे होणार असून त्याबद्दल अथर्व आणि सिनिअर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेल्या पांडुरंग म्हात्रे यांचे …
Read More »एक्स्प्रेस वेवर दोन चालकांचा मृत्यू
खोपोली : प्रतिनिधी मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर बुधवारी (दि. 6) सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत दोन चालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात एक टेम्पो व एक ट्रक चालक आहे. पुढील वाहनास धडक दिल्याने जबर जखमी होऊन टेम्पोचालकाचा तर ट्रक टर्मिनलमध्ये विश्रांती घेण्यासाठी थांबला असताना ट्रकचालकाचा …
Read More »वीज पडून खांडस गावातील शेतकरी जखमी
कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस गावातील हिरामण मारूती ऐनकर या शेतकर्याच्या अंगावर मंगळवारी (दि. 5) संध्याकाळी वीज पडली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी तेथील विठ्ठल रखुमाई मंदिरावरही वीज पडली, त्यात मंदिराचा काही भाग कोसळून नुकसान झाले आहे. खांडस गावातील हिरामण ऐनकर आणि त्याचा भाऊ पंढरीनाथ ऐनकर हे गावापासून …
Read More »रस्त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार्या राजिप प्रशासनाचे आदिवासी, धनगर बांधवांनी घातले श्राद्ध
अलिबाग : प्रतिनिधी रस्ता बनवून द्यावा या मागणीकडे दुर्लक्ष करणार्या रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाचे बुधवारी (दि. 6) खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा येथील आदिवासी व धनगर बांधवांनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालून निषेध केला. खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडी व खडई धनगरवाडा येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे गावातील रस्त्यासाठी पाठपुरावा …
Read More »कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत भाजपचे आंदोलन
कर्जत : बातमीदार तालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याबाबत कर्जत तालुका भाजप आक्रमक झाला आहे. शहरातील लो. टिळक चौकात तालुक्यातील खराब रस्त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडून कर्जत भाजपने बुधवारी (दि. 6) आंदोलन केले. या आंदोलनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषद बांधकाम खाते यांना भापने जाब विचारला. कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-भडवळ, नेरळ-कळंब, नेरळ-कशेळे, …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये ‘रयत’चा वर्धापन दिन उत्साहात
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 4) रयत शिक्षण संस्थेचा 102वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दुग्धशर्करा योग असा की याच शुभदिनी चालू शैक्षणिक वर्षातील शाळेची घंटा वाजली. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आणि संपूर्ण …
Read More »उरण येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर उरण नगर परिषद हद्दीतील श्री सिद्धिविनायक सोसायटी रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथील नागरिकांनी या रस्त्यामुळे होणारा त्रास नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांना सांगितला. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक सोसायटीमधील रस्त्याचे काँक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 5) नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या …
Read More »उरणमध्ये जलवाहिनी फुटून पाणी वाया; वारंवार होणार्या प्रकाराने एमआयडीसीच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण परिसराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची तीन इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी (दि. 5) सकाळी पुन्हा एकदा अचानक फुटण्याची घटना घडली. जेएनपीटी टाऊनशीप-नवघरदरम्यान फुटलेल्या उच्च दाबाच्या जलवाहिनीमुळे सुमारे 25 फुट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडून लाखो लिटर्स पाणी वाया गेले, परंतु नवघर ते बोकडविरा या एक किमी अंतरावर एमआयडीसीची …
Read More »