दीड-पावणेदोन वर्षांनंतर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे आणि देवळांची कवाडे एकदाची खुली झाल्यामुळे भाविकांनी मनातल्या मनात का होईना सुटकेचा निःश्वास सोडला असेल आणि मनोभावे हात जोडले असतील. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने घाईघाईने मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. यथावकाश मद्यालये आणि उपाहारगृहे देखील सुरू झाली. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी हे आवश्यकच होते, …
Read More »Monthly Archives: October 2021
अजित पवारांना मोठा धक्का; जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा
सातारा ः प्रतिनिधी सातार्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर दाखल बर्याच सभासदांनी …
Read More »‘सुफल आहार’तर्फे गरीब बालकांना मोफत जेवण
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा झोपडपट्टीतील मुलांना दररोज एक वेळचे मोफत जेवण देण्यात येत आहे. समाजातील गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे, अन्नाअभावी बालकांचे मृत्यू होऊ नये, लहान बालकांचे कुपोषण होऊ नये. त्यांना चांगले सुदृढ जीवन जगता यावे या दृष्टिकोनातून ही सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुक्यात सुफल …
Read More »उरण नगर परिषदेत कायदेविषयक जनजागृती शिबिर
उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत उरण तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सोमवारी (दि. 4) उरण नगर परिषद कार्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उरण न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश राहुल बी. पोळ, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, अनिल जगधनी, तसेच अॅड. पराग म्हात्रे, अॅड. व्ही. …
Read More »कामगार नेते स्व. श्याम म्हात्रेंना सर्वपक्षीय आदरांजली
पनवेल ः वार्ताहर ज्येष्ठ कामगार नेते स्व. श्याम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 7) आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी म्हात्रे यांच्या आठवणी जागवत त्यांना आदरांजली वाहिली. या वेळी बोलताना भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले …
Read More »‘आरटीपीसीआर’ चाचण्यांची क्षमता वाढवणार
सध्या दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता नवी मुंबई : प्रतिनिधी तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी नेरूळ येथील मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेची दैनंदिन चाचणी क्षमता वाढविण्यात येणार आहे. सध्या या प्रयोगशाळेत दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे, पण ही क्षमता येत्या काळात थेट पाच हजार चाचण्या …
Read More »रायगडच्या खेळाडूंची राष्ट्रीय दोरीउडी स्पर्धेसाठी निवड
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोल्हापूर येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय दोरी उडी स्पर्धेत रायगड जिल्यातील खेळाडूंनी सात सुवर्ण आणि चार रौप्यपदकांची कमाई केली. या खेळाडूंची संभाजी नगर (औरंगाबाद) येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि कोल्हापूर जम्प रोप असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत राज्यातील 17 जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग …
Read More »हैदराबादचा बंगळुरूवर विजय
अबूधाबी ः वृत्तसंस्था हैदराबादने बंगळुरूचा 4 धावांनी पराभव केला. आयपीएल 2021 स्पर्धेत हैदराबादचा हा तिसरा विजय आहे. हैदराबादने बंगळुरूसमोर विजयासाठी 142 धावांचे आव्हान दिले होते, मात्र बंगळुरूने 6 गडी गमवून 137 धावाच केल्या. या पराभवामुळे टॉप 2मध्ये राहण्याचे बंगळुरूचे स्वप्न कठीण झाले आहे. बंगळुरूची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार विराट कोहली …
Read More »देवेंद्र फडणवीसांचा आज आठ लाख भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद; सेवा समर्पण अभियानानिमित्त होणार कार्यक्रम
मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षाच्या राज्यभरातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व बूथ समिती सदस्य म्हणून काम करणार्या सुमारे आठ लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती …
Read More »आमदार महेश बालदी यांची नागरी सुविधांसाठी सिडको प्रशासनासोबत चर्चा
उरण : रामप्रहर वृत्त नव्याने विकसित होत असलेल्या उलवे नोड, करंजाडे, वडघर, चिंचपाडा, येथे मोठ्या प्रमाणाने नागरीकरण होत असल्याने येथील नागरिकांना सुख सोयी होणे गरजेचे आहे. त्यानुसार नोड विकसित करणे तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध विषयाबाबत उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्यासोबत सोमवारी …
Read More »