Breaking News

Yearly Archives: 2021

टोकियो ऑलिम्पिक उद्घाटनाचा मर्यादित पण नेत्रदीपक सोहळा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

टोकियो ः वृत्तसंस्था कोरोनाच्या सावटामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शुक्रवारी (दि. 23) जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. सोहळ्यादरम्यान सादर करण्यात आलेले नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध संचलन या बाबींनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा …

Read More »

श्रीलंकेसाठी शेवट गोड; तिसर्‍या वन डे सामन्यात भारतावर मात

कोलंबो ः वृत्तसंस्था तब्बल सहा बदल केलेल्या टीम इंडियावर श्रीलंकेने तिसर्‍या आणि शेवटच्या वन डेत तीन गड्यांनी मात केली. ही मालिका भारताने यापूर्वीच जिंकली आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 47 षटकांचा करण्यात आला, पण टीम इंडियाला …

Read More »

भारतीय नारी सब पर भारी..!; मीराबाईवर अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडले आहे. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून नव्या इतिहासाची नोंद केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. मीराबाईच्या या कामगिरीनंतर अनेकांनी ट्विटरवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 1896च्या पहिल्या ऑलिम्पिकपासून …

Read More »

महाड ः भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गाव व पूरग्रस्त महाड शहरास भेट देऊन आढावा घेतला.  

Read More »

डुंगी ग्रामस्थांच्या समस्येसंदर्भात बैठक

पनवेल ः मुसळधार पावसामुळे डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रांतधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार विजय तळेकर, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत शिष्टमंडळाची प्रांत कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार …

Read More »

पनवेलमध्ये मालमत्ता कर भरण्यासाठी पतपेढी, बँकांमध्ये मिळणार सुविधा

पनवेल ः रामप्रहर वृत्त मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बँका, तसेच पतपेढीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांच्या सुचनेनुसार केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. पनवेल महापालिका …

Read More »

चिपळूणमधील महापूर बेतला कोरोनाग्रस्तांच्या जीवावर?; ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू

चिपळूण ः प्रतिनिधी चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चिपळूणमध्ये गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात गेले. हे कोविड रुग्णालय असून तेथे 21 रुग्ण …

Read More »

पोलादपुरात दोन ठिकाणी दरडींनी केला घात; केवनाळे, सुतारवाडीत 11 जणांचा मृत्यू

पोलादपूर ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी येथेही अशाच प्रकारे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोवेले ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे गुरुवारी (दि. 22) रात्री 10च्या सुमारास भूस्खलन झाले. कोसळलेल्या …

Read More »

रायगडात दरडी कोसळून मृत्यूचे थैमान; महाडच्या तळीयेत माळीणची पुनरावृत्ती

38 जणांवर काळाचा घाला; मृतांची संख्या वाढण्याची भीती महाड ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगार्‍याखाली अनेक जण दबले गेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तेथे युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तळीये येथे गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास दरड …

Read More »

गुरूपौर्णिमेनिमित्त गव्हाण विद्यालयात विविध कार्यक्रम

गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व भारतीय असंतोषाचे …

Read More »