Breaking News

Yearly Archives: 2021

संभ्रम नाट्य सुरूच

महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये पदांच्या वाटपावरून अंतर्गत धुसफूस असतेच. विधानसभाध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्या पदावर काँग्रेसचाच नेता बसणार हे उघड असले तरी या बाबतीत होणारे राजकारण थांबायला तयार नाही. खुद्द काँग्रेस पक्षातच विधानसभाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव सुचवायचे यावरून अद्यापही एकमत झालेले दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर …

Read More »

संत तुकाराम, एकनाथ महाराजांच्या पालख्यांचे प्रातिनिधिक प्रस्थान

देहू, पैठण ः प्रतिनिधीआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि पैठणमधून संत एकनाथ महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी (दि. 1) प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान झाले. गेल्या वर्षीपासून कोरोना महामारी कायम असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा झाला, तर आळंदी येथून शुक्रवारी ज्ञानोबा माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे.यंदाही …

Read More »

फार्मा पार्क प्रकल्पाबाबत राज्य शासनाची भूमिका दुटप्पी

अ‍ॅड. महेश मोहिते यांचा आरोपराज्यपालांना भेटून भूमिका मांडणार अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प येणार नाही असे राज्य शासन सांगते. त्याचवेळेस स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य शासन या प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेऊन स्थानिक शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे, असा …

Read More »

कर्नाळा बँकेचे ठेवीदार अधांतरीच

रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर फक्त पाच लाखांपर्यंतच्या ठेवीच मिळणार परत पनवेल ः प्रतिनिधीबोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या दोन हजार 458 ठेवीदारांना विमा कंपनीचा दिलासा मिळणार नसल्याने त्यांच्या 270 कोटी 72 लाख रुपयांचे काय होणार, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. पाच …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉक्टरांचे कौतुक

नवी दिल्ली : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने गुरुवारी (दि. 1) आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित केले. गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला असून देवदूत बनून आपले प्राण वाचवले आहेत. त्यांना सलाम, अशा शब्दांत त्यांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. पंतप्रधान …

Read More »

विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16 मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची लेखी मागणी भाजपचे गणेश भगत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनातून केली आहे. नेरूळ नोडमधील प्रभाग 96 मध्ये सेक्टर 16 परिसरात सनहोम या गृहनिर्माण सोसायटीलगत आणि सनशाईन …

Read More »

कोकण विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ सेवानिवृत्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विभागीय आयुक्त हे पद शेवटच्या माणसापर्यंत शासन योजना राबविण्याची सर्वात मोठी यंत्रणा आहे, असे मत विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले. बुधवारी (दि. 30) ते नियत वयोमानानुसार 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त या पदावर कार्यरत असतांना कोविड-19च्या प्रादूर्भावाच्या …

Read More »

भटके, विमुक्त जाती जमातींचे सर्वेक्षण करा; बबन बारगजे यांची राज्य सरकारकडे मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने सुरू केलेल्या अधिसूचित भटके, विमुक्त आणि अर्ध भटक्या जाती जमातींचे सर्वेक्षण महाराष्ट्रात तातडीने करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजप भटके-विमुक्त सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. बारगजे …

Read More »

तळोजा वसाहतीवर सीसीटीव्हीची नजर

पनवेल : वार्ताहर तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या तसेच वर्षअखेर मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिसांच्या वतीने फेज 1 आणि 2 मध्ये दीडशे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर अखेरीस …

Read More »

सलून व्यवसायाची घडी बसेना!; कमाईच्या वेळेवर निर्बंध; शनिवार-रविवारही जातोय वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निर्बंध शिथिल होताना केशकर्तनालये (सलून) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी या व्यवसायाला अद्याप स्थैर्य प्राप्त झालेले नाही. केशकर्तनालयात लोक शनिवार-रविवार या सुट्यांच्या दिवशी अधिक प्रमाणात जात असतात आणि नेमके त्याच दिवशी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्देश असल्याने परवानगी मिळूनही या व्यावसायिकांचा अर्थार्जनाचा प्रश्न सुटलेला …

Read More »