मुंबई ः प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. यंदा भारताच्या विश्वविजेतेपदाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन …
Read More »Yearly Archives: 2021
पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम परिसरात बिबट्या?
पुणे : प्रतिनिधी भारत-इंग्लंड यांच्यात अलीकडे एकदिवसीय मालिका खेळल्या गेलेल्या पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम आणि साई नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. गहुंजे स्टेडियमच्या पाठीमागे डोंगराळ भाग असून निर्मनुष्य परिसर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे …
Read More »‘केकेआर’मध्ये रिंकू सिंहच्या जागी गुरकीरतसिंग मानला संधी
कोलकाता ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंहला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)च्या संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या आगामी मोसमात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू गुरकीरतसिंग मानला संघात समाविष्ट केले आहे. 30 वर्षीय पंजाबचा अष्टपैलू खेळाडू गुरकीरतने आयपीएलमध्ये एकूण 41 सामने खेळले …
Read More »धोनीला अनोखे द्विशतक साजरे करण्याची संधी
चेन्नई ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सज्ज झाला आहे. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल 2020तील निराशाजनक कामगिरीला मागे सोडून धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार संघाने केला आहे. गतवर्षी आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील अखेरचा सामना आहे का, असे विचारण्यात आले होते …
Read More »आयपीएलचे सामने मुंबईतच होणार?
मुंबई ः प्रतिनिधी वानखेडे स्टेडियमच्या मैदानाची देखरेख करणार्या 10 कर्मचार्यांना आणि संयोजन समितीच्या सहा कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांबाबतची चिंता वाढली आहे, परंतु अल्पसूचनेद्वारे पर्यायी ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती करणे अशक्य असल्यामुळे मुंबईतील सामने अन्यत्र हलवता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट …
Read More »मियामी ओपनचे अॅश्ले बार्टीला विजेतेपद
मियामी (अमेरिका) ः वृत्तसंस्था मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात बार्टी आणि कॅनडाची बिआन्का अँड्रेस्कू आमनेसामने आले होते, मात्र दुखापतीमुळे बिआन्काने माघार घेतली. त्यामुळे बार्टीला विजेता घोषित करण्यात आले. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने पहिला सेट 6-3 असा नावावर केला. दुसर्या …
Read More »नवोपक्रम स्पर्धेत कर्जत शिक्षण विभागाची बाजी
यु ट्यूब चॅनेल ठरतेय भारी कर्जत : बातमीदार तालुका शिक्षण विभागाच्या ’शिक्षण क्रांती’ यू ट्यूब चॅनलच्या कोरोना काळातील कामगिरीने राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयोजित राज्यस्तरीय नवोप्रकम स्पर्धेत भरारी घेतली आहे. या उपक्रमाने कर्जत तालुका राज्यात चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या प्रयत्नाने तसेच …
Read More »ओलमण-चेवणे रस्ता आठ दिवसातच उखडला
कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख-ओलमन-चेवणे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता काही दिवसातच उखडला असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक संताप व्यक्त करत असून, संबंधीत अधिकार्यांनी पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वर्षोनुवर्षे …
Read More »अलिबागचे पोलीस ठाणे होणार बालस्नेही
अलिबाग : प्रतिनिधी येथीले पोलीस ठाणे लवकरच बालस्नेही होणार आहे. बालकांच्या तक्रारी निराकरण, गुन्ह्यात अडकलेल्या बालकांचे पुनर्वसन आणि समुपदेशन करण्याचा प्रयत्न या बालस्नेही पोलीस केंद्रामार्फत केला जाणार आहे. कोकणात पहिल्यांदाच ही संकल्पना पोलिसांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या समोरील भागात या बालस्नेही पोलीस केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. …
Read More »बॅग, मोबाइल चोरटा पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून मुंबईला रवाना होणार्या कोईम्बतुर एक्सप्रेसमधील प्रवाशाची बॅग आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील सी डब्ल्यू ऑफिसमधील कर्मचार्याचा मोबाइल पळवणार्या आरोपीस पनवेल रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. कोईम्बतुर एक्सप्रेसमधून प्रवाशाची 30 हजार रुपयांसह एकूण 35 हजारांचा ऐवज असलेली बॅग पनवेल स्टेशनवरून गाडी सुटताना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper