कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे विविध नागरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत महापलिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी परेश ठाकूर यांनी संबंधित अधिकार्यांना या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. कळंबोलीमधील नागरिकांना रस्ते, गटार, ड्रेनेज, सिव्हरेज …
Read More »Monthly Archives: January 2022
द आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरचे पनवेलमध्ये उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या पनवेलमधील सेंटरचे महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) उद्घाटन झाले. हे सेंटर पनवेलमध्ये सुरू करण्यासाठी माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक शैक्षणिक व मानवहितकारी चळवळ आहे, जी तणावमुक्ती आणि …
Read More »दफनभूमीतील दिवे त्वरित सुरू करावेत; नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त शहरातील से 14 मधील स्मशानभूमीअंतर्गत दफनभूमीतील लाईट बंद असल्याबाबत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता (विद्युत मेट्रो) यांना निवेदन देऊन ती त्वरित सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे. खारघरमधील सेक्टर 14 येथील हिंदू स्मशानभूमीतील लहान मुलांच्या दफनभूमीत हायमास्ट आहे, पण त्या हायमास्ट पोलचे दोन लाईट …
Read More »खराब हवामानामुळेच रावत यांचा मृत्यू; हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात समितीचा प्राथमिक अहवाल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे पहिले प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 8 डिसेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. या अपघातात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासंदर्भात संपूर्ण देशाला प्रश्न पडले होते की, हा अपघात नेमका झाला कसा आणि कशामुळे …
Read More »रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात सात जण कोरोना पॉझिटिव्ह
अलिबाग : शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून अलिबाग येथील पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयातील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात अधिकारी, कर्मचार्यांचा समावेश आहे. मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसाला दीड ते दोन हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. रुग्णवाढ रोखण्यासाठी …
Read More »कर्जत नगर परिषदेच्या कचरा डब्यांची दुर्दशा
स्वच्छतादूतांचे आरोग्य धोक्यात कर्जत : बातमीदार नगर परिषदेच्या घंटागाडीत ज्या डब्यांमधून कचरा टाकला जातो, त्या डब्यांची डब्यांची दुरावस्था झाली आहे. कड्या तुटल्यामुळे स्वच्छता दुतांना ते डब्बे आपल्या डोक्यावर उचलून घेऊन त्यातील कचरा घंटागाडीत टाकावा लागतो. अनेकदा त्यातील कचरा अंगावर पडत असल्याने स्वच्छता दुतांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेमुळे …
Read More »श्रीवर्धन नगर परिषदेचा अजब कारभार
भिंतीवर काढण्याचे चित्र चक्क पारावर रेखाटले; नागरिकांमध्ये चर्चा श्रीवर्धन : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काही सन्मानचिन्ह काढून त्याची जाहिरात करण्याचे आदेश नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना श्रीवर्धन नगर परिषदेने सन्मानचिन्हाचे चित्र भिंतीवर काढण्याऐवजी चक्क पाय सोडून बसण्याच्या पारावर रेखाटले आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात …
Read More »फणसाडमधील वणवे रोखण्यासाठी विहूर ग्रामस्थांचे श्रमदान
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षित रहावे, यासाठी विहूर ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करुन जंगल परिसरात वाढलेली झुडपे, सुके गवत, झाडाच्या सुक्या फांद्या, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षीत रहावे, अभयारण्यातील वृक्ष, वन्यजीव, पक्षी यांचे अस्तित्व व सुरक्षितता टिकून रहावी यासाठी …
Read More »सुधागडात कडधान्ये पिकाला साड्यांच्या कुंपणाचे संरक्षण
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात बहुतांश ठिकाणी कडधान्याची शेती केली जाते. या कडधान्य पिकाचे शेळी व गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताला साड्यांचे कुंपण करत आहेत. पाली-खोपोली मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात साड्यांचे कुंपण लावलेली शेती आढळते. पक्क्या भिंतीचे किंवा लोखंडी जाळी व तारांचे कुंपण करणे परवडत नसल्याने सर्वसाधारणपणे …
Read More »एक्स्प्रेस वेवरून टँकर कोसळला
दोन जण किरकोळ जखमी खोपोली : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्यामुळे मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाणारा टँकर शुक्रवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास 50 फूट खाली जुन्या महामार्गावर कोसळला. सुदैवाने यातील चालक आणि क्लिनर बचावले असून, ते किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईकडे चाललेला टँकर बोरघाटातील दत्तवाडीजवळ आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper