Breaking News

Monthly Archives: January 2022

पेण अर्बन बँकेमध्ये अडकलेल्या पैशांसाठी कर्जतमध्ये सह्यांची मोहीम

कर्जत ः बातमीदार पेण अर्बन बँकेत शेकडो ठेवीदार, खातेदारांचे पैसे अडकले आहेत. गेली 11 वर्षे बँक संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. या लढ्याचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. 15) कर्जतमध्ये सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल 1300 नागरिकांनी सह्या करून आपला पाठिंबा दिला. केंद्र सरकारने नव्याने केलेल्या …

Read More »

रायगड पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव ; 60 जणांना लागण

अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकारी आणि 54 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचाही समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे …

Read More »

16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा होणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशातील 150 स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. स्टार्टअपची संस्कृती देशात सर्वत्र पोहचण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संवादात …

Read More »

कल्पक घरतला शासकीय शिष्यवृत्ती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार गव्हाण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कल्पक माणिक घरत याला सन 2021 या वर्षासाठीची शासकीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. रायगड जिल्ह्याच्या यादीत कल्पकने 206 वा क्रमांक प्राप्त …

Read More »

मोरा येथे घराला आग

जीवितहानी नाही; पतीपत्नी किरकोळ भाजले उरण : वार्ताहर उरण नगर परिषद हद्दीतील मोरा कोळीवाडा, फड न. 12 जवळ जगदिश हरी कोळी यांच्या घरातील गॅस  लिकेजमुळे घराला आग लागली. घरातील पती व पत्नी हे किरकोळ भाजले. संपूर्ण घरातील सामान भस्मसात झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मोरा कोळीवाडा येथील घर …

Read More »

उपमहापौर सीताताई पाटील यांनी केली खांदेश्वर शिवमंदिर तलावाची पाहाणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पसिरातील खांदेश्वर शिवमंदिर येथील तलावाची उपमहापौर सीताताई सदानंद पाटील यांनी शनिवारी (दि. 15) पाहाणी केली. खांदेश्वर तलाव परिसरात सुरक्षा भिंत असून या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. असे असतानाही काही बेशिस्त नागरिक तलावाच्या बाहेरच्या सुरक्षा भिंतीवरून व सुरक्षा रक्षकावर अरेरावी करत तलावात निर्माल्य टाकतात. त्यामुळे तलावाचे …

Read More »

कामोठेतील विद्युत समस्येसंदर्भात बैठक

परेश ठाकूर यांची एमएसईबी अधिकार्‍यांशी चर्चा कामोठे : रामप्रहर वृत्त शहरामध्ये विद्युत पुरवठ्यासंदर्भातील नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामोठे येथे एमएसईबीचे सहाय्यक अभियंता गौतम सूर्यवंशी यांची शुक्रवारी (दि. 14) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी सेक्टर 25 मधील सोल्जर सोसायटीसमोरील ओव्हरहेड केबल भूमिगत करण्याबाबतच्या दिलेल्या निवेदनासंदर्भात …

Read More »

2022मध्येही कमाईची संधी देण्याची भारतीय बाजारात क्षमता!

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com भारतीय बाजार एकतर्फी वर जाताना दिसत असला तरी तो या वर्षभरात याच वेगाने वर जाण्याची शक्यता नाही. अर्थात, काही घटना अशा घडत आहेत की तो आता फार खाली येण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना 2021 सारख्या संधी 2022 मध्येही मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच माझ्या मोबाईलसाठी मी एक …

Read More »

एलआयसीचा आयपीओ अनेक विक्रम करण्यास सज्ज

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com येत्या एक फेब्रुवारीला सादर होणारा देशाचा अर्थसंकल्प आणि त्या पाठोपाठ देशातील सर्वात मोठा ठरू शकेल असा एलआयसीचा येणारा आयपीओ, या मोठ्या आर्थिक घटना आहेत. एलआयसीच्या आयपीओने सरकारी तिजोरीत चांगली भर तर पडेलच, पण गुंतवणूकदारांना देशातील सर्वात मोठी कंपनी होण्याची क्षमता असलेल्या कंपनीत गुंतवणुकीची एक संधी मिळेल. भारतातील …

Read More »

श्रेयवादाच्या पाट्या

मुंबई आणि महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असायला हव्यात या आग्रहाला आता कायद्याचे अधिष्ठान मिळाले आहे. दुकान कितीही मोठे वा छोटे असो, त्याची पाटी मराठी देवनागरी लिपीमध्येच असली पाहिजे अशी सक्ती करणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला, त्यावरून आता श्रेयवादाची लढाई पेटली आहे. माध्यमांमधला सूर पाहता हे सारे नव्यानेच …

Read More »