Breaking News

Monthly Archives: March 2022

रोह्यातील धोकादायक रस्त्याची पोलीस निरीक्षकांकडून पाहणी

रोहे : प्रतिनिधी शहरातील मेहेंदळे वाड्याच्या जागी आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे. त्याच्या समोरील रस्ता अरुंद झाल्याने धोकादायक झाला आहे. सोमवारी (दि. 21) राम मारुती चौकात शिवजयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन केल्यानंतर पोलीस निरिक्षक संजय पाटील यांनी काकासाहेब गांगल मार्ग व भाटे वाचनालयाकडे जाणार्‍या रस्त्यांची पाहणी करत येणार्‍या अडचणी जाणून …

Read More »

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आता अँजिओग्राफी, कॅन्सर निदानही होणार

अलिबाग : प्रतिनिधी आरसीएफ कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्र उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना हृदय विकारावरील अँजिग्राफी किंवा कॅन्सरसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आता मुंबईत जावे लागणार नाही. कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्राचे लोकार्पण मंगळवारी (दि. 22) जिल्हा …

Read More »

‘डीएव्ही’च्या वाढीव फीविरोधात पालकांचे आंदोलन; तक्रारींसंदर्भात आज सुनावणी

नवी मुंबई : प्रतिनिधी सिवूडस येथील डीएव्ही पब्लिक स्कूलने शाळेच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त फी घेऊ नये यासाठी पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (दि. 22) सकाळी सर्व पालक शाळेसमोर एकवटून डीएव्ही शाळा अतिरिक्त फी का वसूल करते? याचा जाब विचारण्यासाठी जमले असता शाळेच्या मुख्याध्यापका कांचन मनोजा यांनी पालकांना वेळ देऊनदेखील …

Read More »

ऐतिहासिक वाद

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधिमंडळात शिवजयंतीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुखांपासून सर्व जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मन:स्थितीत असताना सरकारतर्फे अधिकृतरित्या ती तिथीला साजरी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या प्रश्नामुळे सत्ताधारी आघाडी पार चक्रावून गेली. याला उत्तर काय द्यायचे? अखेरीस तुमच्या पाच वर्षांच्या …

Read More »

मुरूडमध्ये ढगाळ वातावरण

आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून, त्याचा त्रास सर्वाना सहन करावा लागत आहे. या हवामान बदलाचा परिणाम प्रामुख्याने आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने …

Read More »

‘कुंडलिका‘ झाली प्रदुषित

नदीपात्रात थेट सोडले जातेय सांडपाणी रोहे : प्रतिनिधी रोह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणार्‍या कुंडलिका नदीपात्रात ठिकठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्याने संपुर्ण कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. त्यामुळे कुंडलिका नदी संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात बारमाही वाहणर्‍या नद्यांमध्ये  कुंडलिका नदीची ओळख आहे. पावसाळ्या तुंडूंब भरुन वाहणारी ही नदी …

Read More »

विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चला

पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 24 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी (दि. 21) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड …

Read More »

माणगाव परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच!

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा माणगाव : प्रतिनिधी होळी उत्सवात सलग तीन दिवस सुट्या आल्याने चाकरमानी मिळेल त्या वाहनांनी कोकण व तळ कोकणात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना होळीची पूजा वेळेवर करता आली नाही. रविवारी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाला  महाड येथे …

Read More »

पनवेलमध्ये धम्म परिषद उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सिद्धार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 21) धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. पूज्य भदंत के. आर. लामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत …

Read More »

पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या सिडको अधिकार्‍यांना शिवाजीनगर ग्रामस्थांनी हाकलले

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता मंगळवारी (दि. 22) शिवाजीनगर येथील पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अधिकार्‍यांना संतप्त ग्रामस्थांनी हाकलून लावले. पूर्वीपासून असणारे पाण्याचे कनेक्शन तोडण्यास या वेळी ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवाजीनगर येथील पिण्याचे पाण्याचे कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता …

Read More »