Breaking News

Monthly Archives: March 2022

सुधागड कलमवाडीतील पाणी योजनेचे लोकार्पण

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील कलमवाडी येथे स्वदेश फाउंडेशन व लोकवर्गणीतून नळ पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या योजनेमुळे कलमवाडीतील ग्रामस्थांना नळाद्वारे शुद्धपाणी थेट घरापर्यंत मिळाले आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे कलमवाडी ग्रामस्थांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली आहे. तहसीलदार दिलीप …

Read More »

महाडच्या विरेश्वर देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा मिळवून देणार

 विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ग्वाही महाड : प्रतिनिधी शिवकालीन जागृत देवस्थान असलेल्या महाडच्या विरेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केले. महाडचे ग्रामदैवत विरेश्वर देवस्थानच्या छबिना उत्सवाला शिवरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. या मंदिराचा छबिना उत्सव कोकणात प्रसिद्ध आहे. …

Read More »

पोलादपुरात श्रीसदस्यांची स्वच्छता मोहीम

पोलादपूर : प्रतिनिधी स्व. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी दिनानिमित्त श्रीसदस्यांनी संपूर्ण पोलादपूर शहरात स्वच्छता मोहीम राबविली. हे काम स्तुत्यच आहे, असे  मत पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केले. पोलादपूर तालुक्यातील श्रीसदस्यांनी मंगळवारी सकाळपासून सुरू केलेल्या शहर स्वच्छता मोहिमेचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी तहसीलदार देसाई बोलत होत्या. श्रीसदस्य …

Read More »

माणगाव झाले चकाचक; 34 टन कचरा जमा

माणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र भुषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी श्री सदस्यांनी माणगावात स्वच्छता अभियान राबविले. या अभियानामध्ये 34 टन कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला. माणगाव तहसील कार्यालयापासून सकाळी 7.30 वाजता या स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे,रस्त्याच्या दुतर्फा तसेच …

Read More »

पेण शहरात श्री सदस्यांनी गोळा केला 62 टन कचरा

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे मंगळवारी पेण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुक्यातील पेण, दादर वरवणे, सापोली, हनुमानपाडा, वरसई, धावटे, वाशीनाका, रावे, वडखळ, आंबिवली, जिते, शिर्की या 15 बैठकांतील 1034 श्री सदस्यांनी 62 टन सुका व …

Read More »

गुरव समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे, त्यासाठी त्यांना संघटनेच्या वतीने मदत करण्यात येईल, अशी ग्वाही गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी पेण येथे दिली. गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेची सभा पेण पी. के. रिसॉर्ट येथे झाली. त्यावेळी बंडू खंडागळे बोलत होेते. समाज संघटनेत आता युवा पिढीला …

Read More »

पोलादपुरातील पाणी योजना दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

अतिवृष्टीमुळे 22 जुलै 2021 रोजी पोलादपूर तालुक्यातील पाच प्रमुख नद्यांसह अनेक उपनद्यांची पात्रं दुथडी भरून वाहू लागल्याने नदीपात्रातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या जॅकवेल वाहून गेल्या. त्यापैकी पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील एकमेव जुनी पाणीपुरवठा योजना वेळेवर निधी मिळूनही सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय ठेकदारी आणि टक्केवारीच्या व्यवस्थेमुळे पोलादपूर तालुक्यातील नळपाणी …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त आर्या वनौषधी संस्थेतर्फे बिल्व दिन साजरा

पनवेल ः वार्ताहर महाशिवरात्रीचे औचित्य साधून पनवेल येथील आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने बिल्व दिन साजरा करण्यात आला. यावेळी पेण, पनवेल, गोंदिया, रत्नागिरी, बोईसर, डहाणू, अलिबाग, उरण येथे बेलाची रोपे वाटप व लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमात बेलाच्या औषधी गुणधर्मांची माहिती असलेली पत्रकेही वाटण्यात आली. आर्या वनौषधीच्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात वनौषधी तज्ज्ञ …

Read More »

विविध मागण्यांसाठी भाजपचे नवी मुंबई आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई मनपा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी संबंधित संस्थांकडून वारंवार अनामत रक्कम घेत असते, ती वारंवार घेऊ नये. केवळ भाडे आकारावे यांसह बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन दिले. यावर बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत …

Read More »

मराठी न्यायशब्दकोश समृद्ध होणे गरजेचे -डॉ.अस्मिता वैद्य

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात नुकतेच जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वाड्मय मंडळातर्फे ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी त्यांचे …

Read More »