पनवेल : वार्ताहर पनवेल प्रभाग 18मधील लोखंडी पाडा येथील श्री सहयोग सोसायटीची समस्या मार्गी लावण्यात नगरसेवक विक्रांत पाटील यांना यश आले आहे. सोसायटीच्या आवारातून महानगरपालिकेचे अरुंद आणि कमी खोलीचे गटार असल्याकारणाने सांडपाणी वाहत नव्हते. हे छोटे गटार मुख्य नाल्याला जोडले गेले आहेत, परंतु मुख्य नाल्यात कचरा आणि माती पडून पाणी …
Read More »Monthly Archives: April 2022
पनवेलमध्ये विद्युत डीपीला आग
उपमहापौर सीताताई पाटील यांच्याकडून पाहणी पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात विद्युत डीपीला आग लागल्याची घटना घडली. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली. दरम्यान, उपमहापौर सीताताई पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. आगीवर त्वरित नियंत्रण …
Read More »पनवेलमध्ये महापौर सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत
बैठकीत विविध विषयांवर निर्णय; सभेपुढे आलेल्या अर्जांना मंजुरी पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर महापौर कार्यालयाजवळील सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 29) महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात झाली. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीच्या पटलांवरील विविध विषयांना मंजुरी देऊन आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. या …
Read More »रायगडात पारा 40 अंश सेल्सिअसवर
अलिबाग : प्रतिनिधी रायगडकरांना चैत्र महिन्यातच वैशाख वणव्याचे चटके सहन करावे लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसवर पोहचला आहे. उकाड्यामुळे रायगडकर हैराण झाले असून ऊन जरा जास्तच आहे, असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. अलिबाग येथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 …
Read More »नाकर्त्या राज्य सरकारविरोधात महाडकर आज महामार्ग रोखणार
पुरापासून मुक्तीसाठी आक्रमक पवित्रा महाड : प्रतिनिधी महाड आणि पावसाळ्यातील पूर हे समीकरण ठरलेलेच. दरवर्षी महाडला पुराच्या पाण्याचा फटका बसून नागरिक, व्यापार्यांचे नुकसान होते. गेल्या वर्षी तर महाडमध्ये महापूर येऊन हाहाकार उडाला. यानंतर महाडकरांनी आक्रमक पवित्रा घेत सावित्री नदीमधील गाळ काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर चालू झालेले हे काम आता …
Read More »पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या हक्कासाठी 2 मे रोजी धरणे आंदोलन
पेण : प्रतिनिधी घोटाळा झाल्याने पेण अर्बन बँकेवर 23 सप्टेंबर 2010 रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आणि रायगडसह मुंबईमध्ये 18 शाखा असणारी 75 वर्षे जुनी बँक आर्थिक दिवाळखोरीत गेली. त्याला आता 12 वर्षे उलटून गेली, मात्र राज्य शासन व अधिकार्यांनी उदासीनतेचे धोरण अवलंबिले आहे. यामुळे ठेवीदारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष समितीच्या …
Read More »वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य महत्त्वाचे – केशव उपाध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रगती करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी (दि. 29) येथे केले. भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्ये प्रशिक्षण या विषयावर पनवेलमध्ये …
Read More »अवैध गौणखनिज उत्खननामुळे मांडला गावाला धोका
प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात मुरूड : प्रतिनिधी गेल्या अनेक महिन्यांपासून मुरूड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरावर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केले जात असून याकडे स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याबद्दल ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे. गावाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते. मांडला ग्रामपंचायत हद्दीतील गटनंबर …
Read More »आक्षी शिलालेख परिसर सुशोभीकरणाचे महाराष्ट्र दिनी भूमिपूजन
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. या शिलालेखाचे जतन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले असून, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी आक्षी शिलालेख परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख …
Read More »मुरूडच्या रोजा इफ्तार पार्टीत पोलिसांचा सहभाग
मुरूड : प्रतिनिधी कायद्याचे भान राखून प्रत्येकाने आपले सण साजरे करावेत. जातीजातीमध्ये सलोखा राखला गेला तरच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील, असे प्रतिपादन मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन गवारे यांनी येथे केले. मुरूड पोलीस ठाण्यातर्फे शहरातील अखिल खतिब यांच्या वाडीमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पोलीस निरीक्षक …
Read More »